Rupali Chakankar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेसाठी रूपाली चाकणकरांचं (Rupali Chakankar) नाव सध्या चर्चेत आहे. अजित पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता असून चाकणकरांना विधानपरिषदेची आमदारकी देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र आधीच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांना संधी देण्यास पक्षातून विरोध केला जात आहे.
राष्ट्रवादीत ‘रुपाली विरुद्ध रुपाली’ वाद
मनसे सोडून अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक पोस्ट करत चाकणकरांना उघड विरोध दर्शवला आहे. यामुळे राष्ट्रवादीत ‘रुपाली विरुद्ध रुपाली’ वादाला सुरूवात झाल्याचं दिसतंय.
रुपाली पाटील ठोंबरे यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे. एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार अजित दादा नक्कीच न्याय देतील. एकाच महिलेला किती पदे देणार?, असा सवाल केला आहे. पक्षामध्ये इतरही महिला आहेत त्यांना संधी द्यावी, असं रूपाली ठोंबरेंनी म्हटलं आहे.
रूपाली ठोंबरे नेमकं काय म्हणाल्या?
एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार आमचे मा. अजित दादा न्याय नक्की देतील असा विश्वास आहे. एकाच महिलेला किती पदे देणार? काल पासून बातमी वाचत आहे,बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिलं नाही, असं सांगितल्याचं रूपाली ठोंबरे म्हणाल्यात.
पक्षाला कळकळीची विनंती असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इतरही महिला आहेत त्या सक्षमतेने, दमदार कामाने मोठ्या आहेत. पक्षात कर्तुत्वान महिला खूप आहेत त्या सक्षम, काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा इतर महिलांना समान संधी द्यावी. ही विनंती असेल, असं त्यांनी पोस्ट मध्ये म्हटलंय.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेसाठी रूपाली चाकणकर (Rupali Chakankar), सिद्धार्थ कांबळे (Siddharth Kamble) आणि आनंद परांजपे (Anand Paranjape) यांची नावे दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
महायुतीचं टेंशन वाढलं?; शिंदे आणि अजितदादा गटाला मोठं खिंडार
सोलापुरात राजकीय भूकंप, शिंदे व अजितदादा गटाचे दोन बडे नेते महाविकास आघाडीत
गणेश चतुर्थीला राशीनुसार करा हे उपाय, होईल मनातील इच्छा पूर्ण
भारतात सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्यांमध्ये शाहरुख खान अव्वल, आकडा ऐकून थक्क व्हाल
निवडणुकीआधीच भाजपला मोठे झटके; यादी जाहीर होताच राजीनाम्याची लाट






