Rupali Chakankar | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना मोठा धक्का बसला. विधान परिषदेच्या उमेदवारांवरुन पुण्याचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मानकरांसह 600 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. यावेळी बोलताना दीपक मानकरांनी रुपाली चाकणकर यांच्याबाबत देखील नाराजी व्यक्त केली. त्यांनी महिला प्रदेश अध्यक्षपद आणि महिला आयोगाचे अध्यक्षपद एकाच व्यक्तीला दिल्याचं म्हणत रुपाली चाकणकरांना देखील लक्ष्य केलं होतं. अशात राष्ट्रवादी नेत्या रूपाली ठोंबरे या देखील आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी रूपाली चाकणकरांवर (Rupali Chakankar) टीकेची झोड उठवली आहे.
रूपाली ठोंबरे आक्रमक
मी रूपाली चाकणकरांच्या (Rupali Chakankar) आधीपासून राजकारणात आहे. रूपाली चाकणकर साध्या नगरसेविका सुद्धा होऊ शकल्या नाहीत. माझा राजकीय प्रवास 20 वर्षांचा झालाय. रूपाली चाकणकरांना महिला आयोगाचं पुन्हा अध्यक्षपद देण्यात आलं तेव्हा मी त्यांचं अभिनंदन केलं. परंतू रूपाली चाकणकरांना प्रदेशाध्यक्षपद, स्टार प्रचारक, निरिक्षक सगळी पदे एकाच महिलेभोवती जातात. त्यावेळी मी संविधात्मक सांगितलं एक पद, एक व्यक्ती असली पाहिजे. इतर महिलांना देखील न्याय द्यायला पाहिजे, असं म्हणत रूपाली ठोंबरेंनी चाकणकरांवर टीका केलीये.
रूपाली चाकणकरांना संविधान माहिती नाही. त्या मला बाहेरच्या म्हणतात. मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येऊन अडीच ते तीन वर्ष झाले. त्यांना जर मी बाहेरची वाटत असेल तर त्यांना सारखं उत्तर द्यायला मला लाज वाटली पाहिजे, असं रूपाली ठोंबरे म्हणाल्यात.
“छान साडी घालणं आणि फक्त मिरवणं नसतं”
सॉरी टू से रूपाली चाकणकर ताई…पक्षाचे प्रोटोकॉल म्हणजे छान साडी घालणं आणि फक्त मिरवणं नसतं. त्याला संघटन असतं. सगळ्या महिलांना सगळ्या बंधू पुरूषांना एकत्र घेऊन त्यांना काम करून देणं हे देखील पक्षाचे प्रोटोकॉल असतात. मला प्रोटोकॉलशी घेणं देणं नाही. मी लोकांमध्ये निवडून येणारी व्यक्ती आहे. मी सतत सांगते पक्षात इतर महिलांही आहेत त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. मीच मीच मीच नाही चालत, असंही रूपाली ठोंबरे म्हणालेत.
एक व्यक्ती सारखी सोबत आहे म्हणून तुम्ही तिची बाजू घेणार असाल तर बाकीचे पदाधिकारी तुम्हाला नको आहेत? तसं सांगा. आम्ही निर्णय घेऊ. आम्हाला आमची एनर्जी अशा गोष्टींमध्ये नाही वाया घालवायची. वेळ नाही आमच्याकडे, असंही त्या म्हणाल्यात.
महत्त्वाच्या बातम्या-
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता!
मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? शरद पवारांनी जाहीर केलं बड्या नेत्याचं नाव






