Rupali Thombare l राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मात्र अजित पवार गटातील रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्यामध्ये झालेली नाराजी नेमकी कशापद्धतीने काढावी असा मोठा पेच पक्षातील वरिष्ठांना पडला आहे. मात्र या दोन्ही रुपालींमधील नेमक्या वादाचे कारण काय आहे हे पाहुयात…
नेमका वाद काय? :
यासंदर्भात रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, मी याआधी सुद्धा एक व्यक्ती एक पद देण्याचा मुद्दा मांडला होता. मात्र आता रुपाली चाकणकर मला काल बोलल्या की, मी बाहेरची आहे, त्यामुळे मी प्रचंड हर्ट झाले आहे. मग मी बाहेरची आहे तर जाते मी बाहेर.
मात्र अजितदादा मला बोलले की, मी तुम्हाला पक्षप्रवेश दिला आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं काम करा. त्यामुळे मला दादांवर अभिमान आहे. जर एवढे मोठे नेते बोलत असतील तर ते नाराज नसतील. परंतु एक खंत कायम मनात आहे की, मी बाहेरची आहे. मात्र यावर दादा नक्कीच मार्ग काढतील, असा विश्वास रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केला आहे.
Rupali Thombare l एक पद एक व्यक्ती या धोरणाची अडचण काय? :
रुपाली पाटील ठोंबरे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात दादा गटात धुसफूस सुरू असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र एक पद एक व्यक्ती अशी रुपाली ठोंबरे यांनी मागणी केल्यापासून हा वाद वाढल्याचे चित्र समोर आले आहे. त्यावर देखील रुपाली ठोंबरे यांनी त्यांचे म्हणणे मांडले आहे. महिला आयोगाविषयी काही म्हणायचं नाही. मात्र त्य़ा अंगावर ओढून घेत आहेत असे रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या आहेत.
याशिवाय पक्षाने एक पद एक व्यक्ती असं धोरण करावं अशी मागणी रुपाली ठोंबरे यांनी केली आहे. मात्र रुपाली चाकणकर यांना त्या मागणीची काय अडचण आहे हे त्यांनी सांगावं असं आवाहन देखील रुपाली ठोंबरे यांनी चाकणकर यांना केले आहे.
News Title – Rupali Patil Thombare attack on Rupali Chakankar
महत्त्वाच्या बातम्या-
अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडतोय; माजी मंत्र्याचं विधान
लाडक्या बहीणींना खरंच दिवाळी बोनस मिळणार?, जाणून घ्या सत्य
सलमानला पुन्हा धमकी? केली ‘इतक्या’ कोटींची मागणी
उमेदवार यादी जाहीर होण्याआधीच भाजपला मोठा धक्का!
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ तारखेपर्यंत करू शकता अर्ज






