सर्वसामान्यांना झटका! आज १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू

On: October 1, 2025 9:49 AM
Rule Change
---Advertisement---

Rule Change | सप्टेंबर महिना संपून आजपासून ऑक्टोबरची सुरुवात झाली आहे. नव्या महिन्याबरोबरच अनेक नियम आणि आर्थिक बदल लागू झाले आहेत. हे बदल थेट सर्वसामान्य लोकांच्या खिशावर परिणाम करणार आहेत. गॅस सिलेंडरच्या किंमतींपासून ते UPI व्यवहारांपर्यंत, रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते बँक सुट्ट्यांपर्यंत या सर्व क्षेत्रांत बदल झाले आहेत. चला पाहूया आजपासून कोणते नवे नियम लागू झाले आहेत आणि त्यांचा परिणाम कसा होणार आहे.

एलपीजी सिलेंडर महागला :

ऑक्टोबर महिन्याची सुरुवात गॅस सिलेंडर महागल्याने झाली आहे. तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. दिल्लीत आता ही किंमत १५९५ रुपये झाली आहे. मुंबईत किंमत १५४७ रुपये, कोलकात्यात १७०० रुपये आणि चेन्नईत १७५४ रुपये झाली आहे.

मात्र, 14 किलो घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. हा बदल थेट हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक वापरावर परिणाम करणार आहे, ज्यामुळे ग्राहकांवरही अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. (Rule Change From 1 October 2025)

Rule Change | विमान प्रवास महागणार :

ऑक्टोबरपासून विमान कंपन्यांसाठी इंधन म्हणजेच एटीएफ (ATF) महागले आहे. दिल्लीत प्रति किलोलिटर किंमत ९०,७१३ वरून वाढून ९३,७६६ रुपये झाली आहे. मुंबई, कोलकाता आणि चेन्नईतही दर वाढले आहेत. विमान कंपन्यांचा ऑपरेटिंग खर्च वाढल्याने विमान प्रवासाच्या तिकिटांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात हवाई प्रवास करणार्‍यांना याचा सर्वाधिक फटका बसेल.

भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगसंदर्भात मोठा बदल केला आहे. १ ऑक्टोबरपासून, फक्त आधार व्हेरिफिकेशन केलेले प्रवासीच आरक्षण सुरू झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांत ऑनलाइन तिकीट बुक करू शकतील. हा नियम IRCTC वेबसाइट आणि ॲप दोन्हींसाठी लागू आहे. सध्या हा नियम तत्काळ तिकिटांसाठी लागू करण्यात आला आहे. मात्र, रेल्वे काउंटरवरून तिकीट खरेदी करणार्‍यांवर या नियमाचा परिणाम होणार नाही. (Rule Change From 1 October 2025)

UPI व्यवहारात बदल :

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने जुलै महिन्यात जाहीर केलेल्या निर्णयानुसार, १ ऑक्टोबरपासून UPI मधील पीअर टू पीअर (P2P) कलेक्ट फीचर काढून टाकण्यात आले आहे. हे फीचर UPI ॲप्समधून पूर्णपणे हटवण्यात आले असून, त्यामागचा उद्देश म्हणजे व्यवहारांची सुरक्षितता वाढवणे आणि फसवणूक रोखणे हा आहे. याचा थेट परिणाम अनेक लहान-मोठ्या व्यवहारांवर होणार असून, वापरकर्त्यांना आता पर्यायी फीचर्सवर अवलंबून राहावे लागेल.

बँकांच्या सुट्ट्या वाढल्या :

ऑक्टोबर महिना सणांनी भरलेला असल्याने बँकांना या महिन्यात एकूण २१ दिवस सुट्ट्या असतील. यात महात्मा गांधी जयंती, दुर्गापूजा, दसरा, लक्ष्मीपूजा, दिवाळी, भाईदूज, छठपूजा यासारख्या मोठ्या सणांचा समावेश आहे. तसेच दुसरा-चौथा शनिवार आणि रविवार या नियतकालिक सुट्ट्याही आहेत.

मात्र, बँक सुट्ट्या प्रत्येक राज्य व शहरानुसार वेगळ्या असतील. त्यामुळे कोणतेही काम असेल तर सुट्टीची यादी आधी तपासणे आवश्यक आहे.

News Title: Rule Change From 1 October 2025: LPG, UPI, Railway Ticket Booking – 5 Big Changes From Today

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now