मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील प्रवाशांसाठी गुड न्यूज! सरकारने घेतला मोठा निर्णय

On: February 22, 2026 7:02 PM
Pune Traffic News
---Advertisement---

Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ३ फेब्रुवारी रोजी तब्बल ३२ तास वाहतूक ठप्प झाल्यानंतर अडकलेल्या वाहनचालकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या भीषण कोंडीमुळे त्रस्त झालेल्या सुमारे १.२ लाख प्रवाशांना एकूण ५.१६ कोटी रुपयांचा टोल परतावा देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

३२ तासांच्या कोंडीनंतर मोठी घोषणा :

फेब्रुवारी महिन्याच्या ३ तारखेला मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हजारो वाहनांची रांग लागली होती. सुमारे ४० ते ५० किलोमीटरपर्यंत वाहनांची साखळी तयार झाली होती. या अभूतपूर्व कोंडीत जवळपास १.२ लाख वाहनधारक अडकले होते. या सर्वांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ५.१६ कोटी रुपयांचा टोल परत करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास निगमने (Maharashtra State Road Development Corporation) दिली.

हा परतावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळमार्फतच दिला जाणार असून संबंधित रक्कम थेट वाहनचालकांच्या FASTag खात्यांमध्ये जमा केली जाणार आहे. ३ फेब्रुवारी रोजी ज्या वाहनांकडून टोल आकारला गेला आणि जे ३२ तासांच्या कोंडीत अडकले होते, त्या सर्वांचा डेटा संकलित करून परतफेडीची प्रक्रिया राबवली जात आहे.

Mumbai Pune Expressway | डेटा तपासणी आणि थेट खात्यात जमा :

या परताव्यात केवळ मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच नव्हे तर पुणे-बंगळुरू महामार्गावरील टोलचाही समावेश करण्यात आला आहे. ज्या वाहनांच्या फास्टटॅगमधून स्वयंचलित पद्धतीने टोल कपात झाली होती, त्या सर्व व्यवहारांची पडताळणी केली जात आहे. टोल प्लाझांवरील बॅरिकेट्स पूर्णपणे उघडण्यापूर्वी प्रणालीने कपात केलेल्या रकमांची ओळख पटवून त्यांची परतफेड सुनिश्चित केली जाणार आहे. (Mumbai Pune Expressway News)

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास निगमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात ही संपूर्ण रक्कम संबंधित वाहनधारकांच्या FASTag खात्यांमध्ये थेट वर्ग केली जाईल. ३ फेब्रुवारीला प्रोपोलिन गॅसचा टँकर पलटी झाल्याने गॅस गळतीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे बंद ठेवावी लागली होती. परिणामी, पुणे लेनवरही खालापूर टोल प्लाझापर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने घेतलेला हा निर्णय हजारो प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.

News title : Rs 5.16 Crore Toll Refund Announced to Mumbai Pune Expressway

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now