रोहित शर्माचा खरा कर्दनकाळ!, त्या गोलंदाजांमुळे सतत होतोय शून्यावर बाद

On: April 8, 2025 3:58 PM
Rohit sharma
---Advertisement---

Rohit Sharma l एकेकाळी प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजांची दाणादाण उडवणारा टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या फॉर्मसाठी संघर्ष करत आहे. विशेषतः डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध (Left-arm pacers) त्याची कमजोरी उघड झाली आहे. गेल्या 16 महिन्यांत रोहित 12 वेळा फक्त लेफ्ट आर्म पेसरकडून T20 मध्ये बाद झाला आहे.

आयपीएल 2025 मध्येही रोहितचा बुरा काळ सुरूच आहे. आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यांत त्याचा स्कोअर एकदाही 20 च्या वर गेलेला नाही. यामुळे त्याच्यावर आणि मुंबई इंडियन्सच्या (mumbai indians)  फलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

RCB सामन्यात पुन्हा तीच चूक :

7 एप्रिल रोजी वानखेडेवर RCB विरुद्धच्या सामन्यात, रोहितने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 17 धावा केल्या होत्या. पण त्याच क्षणी डावखुऱ्या वेगवान गोलंदाज यश दयालने त्याला बाद केलं, आणि पुन्हा एकदा त्याची कमजोरी उजेडात आली.

2024 पासून T20 क्रिकेटमध्ये रोहितने 26 इनिंग्समध्ये 157 चेंडूंवर फक्त 249 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 158 चेंडूंमध्ये फक्त 158 च्या आसपास, तर सरासरी 20.75 इतकी झाली आहे. त्यातच, 12 वेळा डावखुऱ्या गोलंदाजांनी त्याला बाद केलं आहे. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, लेफ्ट आर्म पेसर रोहितसाठी मोठं आव्हान बनले आहेत.

Rohit Sharma l IPL 2025 मधील कामगिरी :

MI vs CSK – 0 धावा (4 चेंडू)
MI vs GT – 8 धावा (4 चेंडू)
MI vs KKR – 13 धावा (12 चेंडू)
MI vs RCB – 17 धावा (9 चेंडू)

या चार इनिंग्जमध्ये एकूण फक्त 38 धावा करणारा रोहित सध्या पूर्णपणे संघर्ष करताना दिसतो आहे. एका सामन्यासाठी विश्रांती मिळाल्यानंतरही त्याच्या कामगिरीत सुधारणा झालेली नाही.

मुंबईसाठी चिंता वाढली :

मुंबई इंडियन्सला यंदा स्थिर सुरुवातीची कमतरता भासत आहे. रोहितसारख्या अनुभवी फलंदाजाकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असताना, सातत्याने अपयश ही संघासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. डावखुऱ्या गोलंदाजांसमोर रोहितची लाचारी संघाच्या रणनीतीवरही परिणाम करत आहे.

News Title: Rohit Sharma’s Struggles Continue: 12 Dismissals Against Left-arm Pacers in Just 16 Months

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now