रोहित शर्माची क्रिकेटमधून निवृत्ती?, आताच्या घडीची महत्त्वाची घडामोड

On: January 3, 2025 1:10 PM
Rohit Sharma
---Advertisement---

सिडनी: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या कसोटी कारकिर्दीबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. रोहितने जर नजीकच्या काळात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली तर अजिबात आश्चर्य वाटणार नाही, असे सूचक विधान भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की, प्रतिभावान आणि फॉर्मात असलेला युवा खेळाडू शुभमन गिल संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.

पदलालित्याच्या समस्या आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी

रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. पाचपैकी सुरुवातीच्या कसोटी सामन्यात तो दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे खेळू शकला नव्हता. त्यानंतरच्या पाच डावांत त्याची सर्वोत्तम धावसंख्या अवघी १० धावा आहे. शास्त्रींच्या मते, रोहित आतापर्यंत मालिकेत पदलालित्याशी झुंजत असून चेंडू थोडा उशिराने खेळत आहे.

Rohit Sharma | गौतम गंभीर यांच्यानंतर शास्त्री यांचं विधान

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत संघाच्या कर्णधाराच्या स्थानाबाबत कोणतीही स्पष्टता न दिल्याने, सिडनी कसोटीसाठी रोहितच्या अंतिम अकरा मधील स्थानाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर आता शास्त्री यांचे हे विधान आले आहे.

शेवटच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा संदर्भ

भारताच्या शेवटच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मुख्य प्रशिक्षकपदी असताना शास्त्री यांनी रोहितला पाठिंबा दिला होता. आता या मालिकेत ते समालोचन करत आहेत.

रोहितने दणक्यात निरोप घ्यावा – शास्त्री

३७ वर्षीय रोहितने कसोटीच्या भविष्याबाबत निर्णय घेतला तर त्याने दणक्यात निरोप घ्यावा, अशी अपेक्षा शास्त्री यांनी ‘आयसीसी रिव्ह्यू’मध्ये व्यक्त केली. ते म्हणाले, “रोहित त्याच्या कारकिर्दीबाबत निर्णय घेईल. तो त्याच्या कामगिरीचे मूल्यमापन करेल. पण, जर त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. कारण त्याचे वय वाढत आहे आणि त्याचा फॉर्मही खालावला आहे.”

शेवटची कसोटी जिंकून मालिका खिशात घालण्याचे आव्हान

शास्त्री शेवटी म्हणतात की, रोहितने निवृत्तीपूर्वी शेवटची कसोटी जिंकून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न करावा. “त्याने (रोहितने) खेळपट्टीवर जाऊन धमाकेदार फलंदाजी करायला हवी. पाचवी कसोटी जिंकण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही एक कसोटी हरला आहात, पण मालिका गमावलेली नाही,” असे शास्त्री म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

कोणत्या कारच्या कंपनीला भारतात सर्वाधिक मागणी?, महत्त्वाची आकडेवारी उघड

देशमुख प्रकरण भोवलं! धनंजय मुंडेंचा पत्ता कट?

नोंदणी विवाहासाठीची प्रक्रिया काय असते?, अर्ज ते कागदपत्रे सर्व माहिती जाणून घ्या

वाल्मिक कराडने केली सर्वात मोठी मागणी!

लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, घरात ही गोष्ट असेल तर मिळणार नाही लाभ

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now