Mumbai Indians l आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सला अखेर पहिल्या दोन पराभवानंतर पहिला विजय मिळाला असला, तरी रोहित शर्माचा फॉर्म हा संघासाठी आणि चाहत्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यानंतर फ्रेंचायझी मालक निता अंबानी आणि रोहित शर्मा यांच्यात झालेल्या चर्चेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे.
सामन्यात मुंबईचा दणदणीत विजय, पण रोहितचा फॉर्म पुन्हा अपयशी :
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकात्याला 8 गडी आणि तब्बल 43 चेंडू राखून पराभूत करत पहिला विजय मिळवला. रायन रिकल्टनने 62 धावा, तर सूर्यकुमार यादवने अवघ्या 9 चेंडूत 27 धावा करत चमकदार कामगिरी केली. पदार्पण करणाऱ्या अश्वनी कुमारने 4 बळी घेत संघाची कमाल सुरूवात करून दिली. मात्र, या सगळ्यात रोहित शर्मा पुन्हा फ्लॉप ठरला.
12 चेंडूत 13 धावा करून आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर रोहितने आपली विकेट गमावली. विशेष म्हणजे, या सामन्यात कोणताही दबाव नसतानाही हिटमॅन लयीत दिसला नाही. या हंगामातील मागील दोन सामन्यांमध्येही (चेन्नई आणि गुजरात विरुद्ध) तो अपयशी ठरला आहे.
Mumbai Indians l नकोशा विक्रमाने चिंतेत भर :
2022 पासून पहिल्या सहा षटकांत रोहित शर्मा 29 वेळा बाद झाला असून, याआधी हा विक्रम वृद्धिमान साहाच्या नावावर होता (24 वेळा). गेल्या 10 सामन्यांमध्ये रोहितने केवळ 141 धावा केल्या आहेत, ज्यामुळे त्याच्या फॉर्मबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
— Drizzyat12Kennyat8 (@45kennyat7PM) March 31, 2025
दरम्यान, कोलकात्याविरुद्धच्या विजयानंतर निता अंबानी आणि रोहित शर्मामध्ये झालेल्या चर्चेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या दोघांमध्ये काय संवाद झाला हे स्पष्ट नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून चाहत्यांनी विविध तर्क लावायला सुरुवात केली आहे.
काहीजण म्हणतात की ही फक्त साधी चर्चाच होती, तर काहीजणांनी यामध्ये संभाव्य निर्णयाची चाहूल असल्याचेही म्हटले आहे. आयपीएलमध्ये यापूर्वी केएल राहुल आणि संजीव गोयंका यांच्यातील चर्चाही व्हायरल झाली होती आणि चर्चेचा विषय ठरली होती.






