होता रोहित शर्मा म्हणून वाचली मुंबई!, पठ्ठ्यानं मैदानाबाहेर बसून सामना फिरवला

On: April 14, 2025 3:52 PM
Rohit Sharma
---Advertisement---

Rohit Sharma l आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये मुंबई इंडियन्सचा (MI) दिल्ली कॅपिटल्सवर (DC) 12 धावांनी मिळवलेला विजय जितका खेळाडूंच्या कामगिरीमुळे महत्त्वाचा होता, तितकाच त्यामागे होता डगआऊटमध्ये बसलेल्या रोहित शर्माचा (Rohit shamra)  स्मार्ट ब्रेन. सध्या कर्णधार असलेला हार्दिक पांड्या (Hardik pandya) मैदानावर होता, पण जे रोहितने सुचवलं त्याचा परिणाम थेट सामन्यावर झाला. हा निर्णय इतका प्रभावी ठरला की सामना पूर्णपणे मुंबईच्या बाजूने झुकला.

सामन्याच्या 13व्या ओव्हरनंतर दिल्लीची अवस्था नियंत्रणात असतानाच रोहितने हेड कोच माहेला जयवर्धने यांना एक सल्ला दिला – नवीन चेंडू घेऊन स्पिन अटॅक सुरु करा. पुढच्याच तीन ओव्हर्समध्ये या निर्णयाचा परिणाम दिसून आला आणि मुंबईने सामन्यावर पकड मिळवली.

शर्मा-सँटनर यांचा डबल अटॅक; दिल्लीची अवस्था बिकट :

रोहितच्या सूचनेनुसार, मुंबईने कर्ण शर्मा आणि मिचेल सँटनरला दोन बाजूंनी आक्रमणावर आणलं. या जोडीने पुढच्या तीन षटकांत फक्त 19 धावा दिल्या आणि ट्रिस्टन स्टबस आणि केएल राहुलसारख्या महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केलं. (Rohit shamra)

सामन्याचा प्रवाह याच क्षणापासून बदलला. दिल्लीची टीम जेव्हा सहज विजयाकडे वाटचाल करत होती, तेव्हाच मुंबईने त्यांना खिंडार पाडलं.

Rohit Sharma l सामना मुंबईकडे आणि ‘मॅन ऑफ द मॅच’ कर्ण शर्माकडे :

या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत 205 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दिल्लीची टीम 193 धावांवरच आटोपली. मुंबईच्या विजयात तीन विकेट घेणारा कर्ण शर्मा (Karn sharma) निर्णायक ठरला आणि त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला.

दिल्लीसाठी हा सीजनमधील पहिलाच पराभव होता, तर मुंबईसाठी सहा सामन्यांतील दुसरा विजय. पण रोहित शर्माने डगआऊटमध्ये घेतलेला निर्णय सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अनेक चाहते म्हणत आहेत, “कॅप्टन ना सही, पण क्लास कायम!”

News Title: Rohit Sharma’s Dugout Decision Turns the Game for MI – Even Hardik Pandya Didn’t Think of It!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now