रोहित शर्माची तडकाफडकी निवृत्ती; खरं कारण आलं समोर

On: May 8, 2025 4:30 PM
Rohit Sharma Retirement
---Advertisement---

Rohit Sharma Retirement | भारतीय क्रिकेटचा हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 7 मे रोजी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत क्रिकेटप्रेमींना धक्का दिला. विशेष म्हणजे, अवघ्या दोन आठवड्यांपूर्वीच त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत खेळण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे इतक्या अल्प वेळात काय घडलं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Rohit Sharma Retirement)

खरं तर रोहित शर्मा (Rohit Sharma) खरोखरच निवृत्त होणार नव्हता. त्याने निवड समितीला फक्त दोन कसोटी सामने खेळण्याची परवानगी मागितली होती आणि कर्णधारपद सोडण्याचीही तयारी दर्शवली होती. मात्र, निवडकर्त्यांनी त्याचा प्रस्ताव फेटाळला आणि दीर्घकालीन नेतृत्वाचा विचार करत, रोहितला संघात स्थान न दिल्याने त्याने तडकाफडकी निवृत्ती घेतली.

निवडकर्त्यांच्या निर्णयामुळे रोहितचं ‘टेस्ट’ करिअर संपलं? :

अहवालानुसार, रोहित आणि निवडकर्त्यांमध्ये गेल्या आठवडाभर चर्चा सुरु होती. रोहितला इंग्लंडविरुद्ध दोन कसोटीत खेळून आपली सध्याची स्थिती तपासायची होती. मात्र, निवडकर्त्यांना असा कर्णधार हवा होता जो दीर्घकाळ नेतृत्व करू शकेल. त्यामुळे रोहितला बाजूला काढताच त्याने कसोटी क्रिकेटला अलविदा केला.

या पार्श्वभूमीवर, रोहितच्या जागी कोण नवा कर्णधार होणार यावरही चर्चा सुरू आहे. विराट कोहलीचं नाव पुन्हा चर्चेत आलं असून, जसप्रीत बुमराह, केएल राहुल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्याही नावांचा विचार होत आहे. मात्र पंत सध्या फॉर्मआउट आहे आणि गिल परदेशी भूमीवर अजून सिद्ध झालेला नाही. (Rohit Sharma Retirement)

Rohit Sharma Retirement | रोहितच्या निर्णयावर भावुक प्रतिक्रिया; एक युग संपलं? :

सचिन तेंडुलकर, शिखर धवन यांसारख्या खेळाडूंनी रोहितच्या निर्णयावर भावनिक प्रतिक्रिया दिल्या. “2013 मध्ये तुला पाहिलं होतं, आणि आज तुझं टप्प्यावरचं करिअर संपल्याचं ऐकून भावूक झालो,” असं सचिनने म्हटलं. क्रिकेटप्रेमींसाठी रोहितची ही निवृत्ती एका युगाच्या समाप्तीची सुरुवात मानली जात आहे.

आता निवडकर्त्यांच्या पुढे मोठं आव्हान आहे – दीर्घकाल टिकणारा आणि यशस्वी कसोटी कर्णधार निवडण्याचं. रोहितची जागा भरून काढणं अवघड असलं तरी भारतीय संघाला पुढे नेण्यासाठी नव्या नेतृत्वाला संधी मिळणार आहे.

News Title: Rohit Sharma Wanted to Play Two More Tests – Real Reason Behind Sudden Retirement Revealed

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now