Rohit Sharma। भारतात क्रिकेटला प्रचंड महत्त्व आहे. क्रिकेटप्रेमींची आपल्याकडे काहीच कमी नाहीये आणि जेवढ प्रेम क्रिकेटवर आहे तेवढच प्रेम क्रिकेटपटुंवरही आहे. त्यांची खेळण्याची शैली असो त्यांचं व्यक्तिमत्त्व असो वा त्यांचा फॅशन लुक. एकंदरीतच त्यांच्या सगळ्याच गोष्टींवर आपले विशेष प्रेम आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक खेळाडू प्रचंड चर्चेत आहे. भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या सोशल मीडियावर धूमाकुळ घालत आहे.
भारताचा ‘हिटमॅन’ आता ‘फिटमॅन’! रोहित शर्माने कमी केले तब्बल 10 किलो वजन
By Aditi Rathod
On: October 9, 2025 4:50 PM
---Advertisement---
मुंबईत मंगळवारी झालेल्या सीएट क्रिकेट पारितोषिक वितरण सोहळ्यात रोहितने केलेला नवीन लुक बघून चहात्यांना आणि विशेषतः टीका कारण्यारांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. रोहित शर्माचे नवीन फोटो वायरल होत आहेत. या नवीन फोटोमध्ये रोहित शर्माने (Rohit Sharma) वजन कमी केल्याचे दिसत आहे. रोहित शर्माने तब्बल 10 किलो वजन कमी केलं असून रोहित शर्माने टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. फोटो मध्ये दिसतंय फोटो मध्ये रोहितने ब्लेझर घातले आहे आणि तो एकदम स्लिम दिसत आहे. त्याने चांगलेच वजन कमी केले असून त्याचे पोटहि आत गेले आहे. फोटो मध्ये रोहितने ब्लेझर घातले आहे आणि तो एकदम स्लिम दिसत आहे.
बऱ्याच काळापासून रोहितला त्याच्या वाजनावरून ट्रोल केले जात आहे. भारतीय संघाचा कर्णधार असून वजन वाढल्याने रोहित टिकेचा सामना करत होता. भारतीय संघाचे कर्णधारपद जाण्यामागे रोहित शर्माचे वाढते वजन कारणीभूत असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. रोहित शर्माचे करियर आता संपलं, रोहित आउट ओफ फॉर्म गेला आहे आशा कितीतरी टीका रोहित शर्मावर केल्या जात होत्या.
गेल्या काही दिवसातच भारत ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होणार आहे. 4 ऑक्टोबर रोजी भारताने या दौऱ्यासाठी संघ जाहीर केला होता. त्यात रोहित आणि विराट दोघांचाही समावेश आहे. या लिस्टनुसार शुभमन गिल (Shubhman gill) भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. रोहित शर्मा ओपनिंग आणि विराट नंबर 3 ला खेळणार आहे. या बातमीनंतर रोहितचे चाहते नाराज झाले असून त्यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्तही केली होती. यासाठी रोहितचे वाढते वजन जबाबदार आहे असे बरेच लोक म्हणत असताना रोहित शर्मा वजन कमी करत होता.
३७ वर्षांच्या रोहित शर्माने आपल्या खेळासाठी या वयात ट्रान्सफॉर्मेशन करुन चाहत्यांना मोठा दिलासा दिला आहे. भारताच्या हिटमॅन आता फिटमॅन झाला आहे. रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफिनंतर ७ महिन्यांनी भारत-ऑस्ट्रेलिया एक दिवसीय सामान्यांच्या मालिकेत खेळणार आहे. त्यामुळे आधीच क्रिकेटप्रेमी आणि रोहितचे चाहते आनंदात होते. आणि आता रोहितचा हा नवीन लुक पाहून त्यात भर पडली आहे.






