Rohit shamra l आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या रोहित शर्माने (Rohit Sharma) एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केला आहे. सध्या जरी तो बॅटने फारशी मोठी कामगिरी करत नसला, तरी त्याचा अनुभव आणि एक सिक्सनं केलेली कामगिरी आयपीएलच्या इतिहासात नोंदली गेली आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याने मारलेला एक षटकार त्याच्या कारकिर्दीत नवा विक्रम ठरला आहे.
दिल्लीविरुद्ध 50 सिक्सेस – इतिहास रचणारा ‘हिटमॅन’ :
या षटकारासह रोहित शर्मा (Rohit sharma) आयपीएलमध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध 50 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. हे यश त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मिळवलं आहे. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, केएल राहुल यांसारख्या खेळाडूंना मागे टाकत रोहितने ही खास कामगिरी केली.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने (Rohit shamra) फक्त 12 चेंडूत 18 धावा केल्या, ज्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार होता. याच षटकारामुळे त्याने दिल्लीविरुद्ध एकूण 50 षटकार पूर्ण केले.
या यादीतील अन्य भारतीय खेळाडू (Rohit Sharma 50 sixes record) :
महेंद्रसिंग धोनी – RCB विरुद्ध 49 षटकार
विराट कोहली – CSK विरुद्ध 43 षटकार
केएल राहुल – RCB विरुद्ध 43 षटकार
रोहित शर्मा – KKR विरुद्ध 41 षटकार
रोहित शर्मा हा आयपीएलचा एक अनुभवी चेहरा आहे. 2008 पासून IPL मध्ये सातत्याने खेळणारा, आणि मुंबई इंडियन्सला पाच वेळा चॅम्पियन बनवणारा हा कर्णधार आजही नव्या पिढीच्या खेळाडूंना मार्गदर्शक ठरतो. (Rohit shamra)
सामन्याचा आढावा – बुमराहच्या संघर्षातून मुंबईचा विजय :
या सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) प्रथम फलंदाजी करत 205 धावा केल्या. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर यांनी चांगली कामगिरी केली. दिल्ली कॅपिटल्सच्या करुण नायरने 89 धावा करत जोरदार प्रयत्न केला, पण त्याला साथ मिळाली नाही.
मुंबईकडून कर्ण शर्माने (Karn sharma) 3 विकेट्स घेत सामनावीर पुरस्कार पटकावला. जसप्रीत बुमराह मात्र अजूनही फॉर्मसाठी झगडताना दिसतोय.
आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सचा हा दुसरा विजय ठरला. आणि रोहित शर्मासाठी ही संधी ठरली इतिहासात आपले नाव कायमस्वरूपी कोरण्याची!






