ICC ODI Ranking | आशिया कप 2025 साठी संघ जाहीर झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आयसीसीच्या ताज्या वनडे रँकिंगकडे लागले होते. पण यातच एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचे कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat kohli) या दोघांना आयसीसीने वनडे रँकिंगमधूनच डच्चू दिला आहे. (ICC ODI Ranking)
गेल्या आठवड्यातच या दोघांची स्थिती मजबूत होती. रोहित 756 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर तर विराट 736 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर होता. पण केवळ काही दिवसांतच या दोघांचा वनडे रँकिंगमधून पत्ता कट झाला आहे.
रँकिंगमधून अचानक गायब का झाले? :
आयसीसीच्या नियमानुसार एखादा खेळाडू 9-12 महिने वनडे सामने न खेळल्यास किंवा निवृत्त झाल्यास त्याचा क्रमवारीत समावेश होत नाही. मात्र रोहित आणि विराट यांच्यावर हे नियम लागू होत नाहीत. कारण या दोघांनी पाच महिन्यांपूर्वी मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये खेळले होते.
त्याशिवाय हे दोघे फक्त कसोटी आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये अजूनही त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे त्यांच्या रँकिंगमधून गायब होण्यामागे नियमांपेक्षा तांत्रिक कारण असावं, अशी चर्चा आहे.
ICC ODI Ranking | तांत्रिक चूक की नवा नियम? :
मिळालेल्या माहितीनुसार, हे तांत्रिक कारणामुळे झालं असावं. आयसीसीकडून लवकरच सुधारित रँकिंग जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाहत्यांनी अजूनही आशा सोडलेली नाही. (ICC ODI Ranking)
भारतीय संघाचा महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या या जोडीचा क्रमवारीतून गायब होणं चाहत्यांना धक्का देणारं ठरलं आहे. पण पुढील काही दिवसांत परिस्थिती स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे.






