रोहित शर्माच्या आयुष्यात ‘ज्युनिअर हिटमॅन’ची एंट्री; पत्नी रितिकाने दिला मुलाला जन्म

On: November 16, 2024 8:19 AM
Rohit Sharma Son Name
---Advertisement---

Rohit Sharma | टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या आयुष्यात एका गोंडस पाहुण्याची एंट्री झाली आहे. रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. रोहितची पत्नी रितिका (Ritika sharma) हिने मुलाला जन्म दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रितिका हिने शुक्रवारी, 15 नोव्हेंबर रोजी मुंबईत मुलाला जन्म दिला. या बातमीने रोहितच्या चाहत्यांनाही प्रचंड आनंद झाला आहे. रोहित आणि रितिका यांना समायरा नावाची मुलगी देखील आहे. (Rohit Sharma)

आता रोहित शर्माच्या कुटुंबात आणखी एक सदस्य जोडला गेलाय. रोहितची मुलगी समायरा हिला लहान भाऊ मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून रोहित पुन्हा बाबा होणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. त्यामुळे चाहते देखील या गोड वृत्ताची वाट बघत होते. अखेर ही प्रतीक्षा देखील संपली आहे.

रोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाबा

रोहित आणि रितीका दोघेही 2015 मध्ये लग्नबंधनात अडकले. यानंतर डिसेंबर 2018 मध्ये त्याची मुलगी समायरा हिचा जन्म झाला. आता नोव्हेंबर 2024 मध्ये रोहितच्या आयुष्यात ‘ज्युनिअर हिटमॅन’आला आहे. रितिकाने एका गोंडस मुलाला जन्म दिलाय. (Rohit Sharma)

मुलाच्या जन्माची वाट पाहत असताना रोहितला कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होता आले नाही. त्यामुळे पहिल्या कसोटीत तो खेळू शकणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे.

रोहित पहिला कसोटी सामना खेळणार की नाही?

अजूनही रोहित पहिली कसोटी खेळणार की नाही?, यबाबत स्पष्टता मिळालेली नाही. आता तो थेट 6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत हजेरी लावू शकतो, असं म्हटलं जातंय. तर, दुसरीकडे बोर्डाने त्याला तत्काळ ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची तयारी केली असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. (Rohit Sharma)

News Title :  Rohit Sharma and Ritika blessed with baby boy

महत्वाच्या बातम्या –

आज शनिदेवाच्या कृपेने ‘या’ राशींच्या मनोकामना पूर्ण होणार!

‘स्वाभिमानासाठी एकजुटीने….’; संभाजी पाटील निलंगेकरांचं मतदारांना आवाहन

…म्हणून भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला गुरूद्वाऱ्यातून बाहेर काढला!

ऐन विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना मोठा धक्का!

आम्ही हे करु! मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध, राज ठाकरेंकडून मोठ्या घोषणा

Join WhatsApp Group

Join Now