Rohit Pawar | पुण्यातील कोथरूड (Kothrud) गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी निलेश घायवळचा (Nilesh Ghayawal) व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहेत. व्हिडिओमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar Faction) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या मातोश्री सुनंदा पवार, निलेश घायवळच्या शाळेतील मदतीबद्दल आभार मानताना दिसत आहेत. ही घटना राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणत असून विरोधकांनी या प्रसंगाचा जोरदार वापर केला आहे.
सुनंदा पवारांनी घायवळचे मानले आभार :
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, कोव्हिड काळात निलेश घायवळने शाळेची मदत केली होती आणि सुनंदा पवार यांनी त्याबद्दल आभार मानले. या व्हिडिओच्या प्रसारानंतर भाजपकडून रोहित पवार आणि सचिन घायवळ यांच्याशी संबंधित फोटो सोशल मीडियावर प्रकाशित केले गेले.
लाईव्ह |📍मुंबई | पत्रकारांशी संवाद |🗓️09-10-2025
https://t.co/4674izhcJH— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 9, 2025
यामध्ये परवान्यासाठी अर्ज कसा करण्यात आला, याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच 2019 च्या निवडुकीत निलेश घायवळ हा रोहित पवारांचे काम करत असल्याचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता योगेश कदम यांच्यानंतर रोहित पवारही अडचणीत आल्याचे दिसत आहे.
मंत्री कदमांच्या राजीनाम्याची मागणी :
काही दिवसांपूर्वी गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ (Sachin ghaiwal) याला शस्त्र परवाना मंजूर केल्याचा धक्कादायक खुलासासमोर आला आहे. पोलिस अहवालानुसार सचिन घायवळवर आधीच गंभीर गुन्हे नोंदवले गेले होते, तरीही हा परवाना मंजूर झाल्याने विरोधकांनी योगेश कदम (Yogesh kadam) यांच्या अधिकारांचा गैरवापर झाल्याचा आरोप केला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी मंत्री कदम यांच्याकडून तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे.
पोलिस तपासात असेही आढळले आहे की निलेश घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी पत्ता बदलला होता आणि तो सध्या परदेशात असल्याचे अहवालात नमूद आहे. या पार्श्वभूमीवर “कसा पासपोर्ट मिळाला?” असा प्रश्नही उठला आहे आणि संबंधित चौकशी सुरू आहे.
राजकीय वातावरणात या घटनांमुळे तणाव वाढला आहे. विरोधकांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर मंत्री कदम यांनी सांगितले की त्यांनी संबंधित पोलीस अहवाल व नियम पाहूनच निर्णय घेतला. प्रशासन आणि पोलिस तपास अजून सुरू आहेत, ज्यात पासपोर्ट आणि शस्त्र परवाना मंजुरीसंबंधी कागदपत्रांची चौकशी केली जात आहे.






