‘अरे ढाण्या थोडक्यात वाचलास’, अन् रोहित पवार अजितदादांच्या पायाच पडले; पाहा Video

On: November 25, 2024 1:08 PM
Rohit Pawar meets Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar | आज 25 नोव्हेंबररोजी संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या प्रीतीसंगम या समाधीस्थळी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी अजित पवार देखील उपस्थित होते. याच ठिकाणी काका-पुतण्याची भेट झाली. आमदार रोहित पवार आणि अजित पवार दोघेही एकमेकांना भेटले. (Ajit Pawar)

विधानसभा निवडणुकीच्या नंतर अजित पवार आणि रोहित पवार यांची आज (25 नोव्हेंबर) नुकतीच भेट झाली. आज दोघेही एकमेकांच्या समोर आले. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी काका अजितदादा यांना पाहताच त्यांचे पाया पडून दर्शन घेतले. यावेळी अजितदादांनी अगदी मिश्किल भाषेत रोहित पवार यांना टोला लगावला. दोघांचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. राजकारणात एकमेकांविरोधात असतानाही प्रत्यक्ष भेटताना त्यांच्यातील हा जिव्हाळा चर्चेचा विषय ठरतो आहे.

अजित पवार- रोहित पवार भेट-

काका-पुतण्याच्या या भेटीवेळी अजित पवार यांनी रोहित पवारांची फिरकी घेतल्याचं देखील दिसून आलं. रोहित पवार यांच्या विजयानंतर अजित पवारांनी त्यांचं अभिनंदन केलं आणि मिश्किलपणे काकाचं दर्शन घे, असंही म्हटलं. त्यानंतर रोहित पवार यांनीही अजित पवारांच्या (Ajit Pawar) पाया पडत आशीर्वाद घेतल्याचं पाहायला मिळालं.

रोहित पवार त्यांच्या पाया पडले त्यावेळी अजित पवार त्यांना “शहाण्या थोडक्यात वाचलास” असं म्हणाले. पुढे अजित पवारांनी ‘मी सभा घेतली असती तर काय झालं असतं?’, असं मिश्किलपणे रोहित पवार यांना उद्देशून म्हटलं. यानंतर दोघेही हसत-हसत पुढे आपल्या मार्गाने पुढे गेले. दोघांचा या प्रसंगीचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे.

दरम्यान, शरद पवार गटाचे नेते रोहित पवार हे या निवडणुकीत कर्जत-जामखेडमधून उभे होते. त्यांच्याविरोधात महायुतीकडून राम शिंदे निवडणुकीच्या रिंगणात होते. रोहित पवार यांचा 1 लाख 27 हजार 676 मतांनी विजय झाला आहे. तर, राम शिंदे यांना 1 लाख 26 हजार 433 मते पडली. (Ajit Pawar)

News Title –  Rohit Pawar meets Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या-

मी कटाचा बळी ठरलो; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप

पराभव जिव्हारी लागला; काँग्रेसचा बडा नेता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्यातील ‘या’ 20 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार?

भाजपला मिळणार सर्वाधिक मंत्रीपदं?, महायुतीचा संभाव्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर

पराभवानंतर राज ठाकरेंना आणखी एक धक्का, मनसेचं ‘इंजिन’ धोक्यात?

Join WhatsApp Group

Join Now