“रोहित पवार शरद पवारांचा पुढील वारसा..”, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

On: October 1, 2024 4:34 PM
Supriya Sule
---Advertisement---

Supriya Sule l राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु असतानाच आमदार रोहित पवार यांच्याबाबत शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. शरद पवार म्हणाले होते की, रोहितने कधीही पदाची अपेक्षा केलेली नाही. तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडणून आल्यानंतर देखील रोहितने चांगलं काम केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? :

याशिवाय रोहितची पहिली पाच वर्षे तुमची सेवा करण्यासाठी आहेत आणि त्यानंतर पुढची पाच वर्षे ही महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आहेत असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. याबाबत सुप्रिया सुळेंनी देखील भुवया उंचावणारं वक्तव्य केलं आहे. शरद पवारांचा वारसा रोहित पवार चालवणार असतील तर त्यात मला काय हरकत असेल? असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

“आमदार रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले किंवा रोहितने शरद पवारांचा वारसा चालवला तर याला माझी हरकत असण्याचं कारणच काय आहे? तसेच रोहितच का? माझ्या वडिलांचा वारसा कुणीही चालवू शकतं.” असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळेंनी केलं आहे.

Supriya Sule l अजित पवारांनी चूक मान्य केली :

राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 2023 मध्ये फुटला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीत सहभागी होत शरद पवारांसोबत विरोधी भूमिका घेतली आहे. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत देखील अजित पवारांनी बहीण सुप्रिया सुळेंच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना महायुतीकडून उमेदवारी दिली. यानंतर अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर देखील खूप टीका झाली.

तसेच लोकसभा निवडणुकीत देखील दिसून आलं आहे की, बारामतीकर हे अजूनही शरद पवारांबरोबरच आहेत. कारण लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेविजयी झाल्या आहे. त्यानंतर काही दिवस गेल्यानंतर अजित पवारांनी देखील ही चूक मान्य केली. यानंतर आता सर्वांचे लक्ष हे विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे.

News Title – rohit pawar becomes successor to my father

महत्वाच्या बातम्या-

राज्य सरकार लाडक्या बहिणींना विकत घेणार का?; काँग्रेसच्या महिला खासदाराचा थेट सवाल

लग्नाआधीच्या शारीरिक संबंधांवर ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली देवाला सुद्धा…

बिग बॉस ग्रँड फिनालेपूर्वी Mid-Week एलिमिनेशन; व्होटिंग लाइन्स ‘या’ दिवशी बंद होणार?

फक्त 13 हजार रुपये देऊन खरेदी करा iPhone 16; जाणून घ्या ऑफर

सुरज चव्हाण झळकला मोठ्या पडद्यावर! चित्रपटातील रोमँटीक गाणं रिलीज

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now