बीड पोलीस ठाण्यात आणले 5 पलंग, रोहित पवारांनी कराड कनेक्शन असल्याचा केला आरोप!

On: January 2, 2025 11:21 AM
Rohit Pawar
---Advertisement---

Rohit Pawar l बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला हत्या करण्यात आली. मात्र या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. कारण या हत्येमागे वाल्मिक कराड असल्याची माहिती मिळाली. मात्र त्यानंतर वाल्मिक कराड ३१ डिसेंबरला पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. मात्र आता कराडची बीड पोलीस ठाण्यात सीआयडी चौकशी होत आहे. त्याचवेळी आता बीड पोलीस ठाण्यात पाच पलंग आणण्यात आले आहेत. त्यामुळे पलंगाचा संबंध आमदार रोहित पवार यांनी वाल्मिक कराड यांच्याशी जोडला आहे.

रोहित पवार काय म्हटले? :

बीड पोलीस ठाण्यात पाच पलंग आणण्यात आले आहेत. यावरून रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये रोहित पवारांनी अचानक पलंग कसे मागवले? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच रोहित पवारांनी ट्विट मध्ये म्हंटल आहे की, बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. मात्र हे पलंग स्टाफसाठी मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट देखील केले आहे.

परंतु, आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न पवार यांनी उपस्थित केले आहेत. तसेच बीड पोलीस ठाण्यात नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी असल्याचं रोहित पवार यांनी म्हंटल आहे.

Rohit Pawar l पोलिसांनी दिलं स्पष्टीकरण :

दरम्यान, बीड पोलीस ठाण्यात मागवलेल्या पलंगाच्या बातम्या येताच पोलिसांनी तातडीने नवीन पलंग का मागवले यासंदर्भात खुलासा केला आहे. तर बीड पोलीस ठाण्यात पलंग नव्हे तर पोलीस शिपायांसाठी कॉट आणल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याशिवाय सीआयडीने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला १५ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयात मागितली गेली होती. मात्र त्यानंतर न्यायालयाने त्याला त्याला १५ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. त्यामुळे वाल्मिक कराड हा पोलीस कठोडीत असताना अचानकपणे पोलीस ठाण्यात पलंग मागवण्यात आल्याने रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

News Title : Rohit Pawar allegation that five beds were brought to Beed police station

महत्त्वाच्या बातम्या-

मोठ्या आकाला वाचवण्यासाठी कराडचं एन्काऊंटर होणार?, अत्यंत खळबळजनक दावा समोर

“हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक होते पण महाराष्ट्रात…”; ‘या’ नेत्याचा हल्लाबोल

नवीन वर्षात सोनं स्वस्त झालं की महाग?, काय आहेत सध्या ग्रॅमचे दर?

सरकारला कोटींचा चुना लावत GFवर उधळले पैसे; अखेर ‘तो’ आरोपी अटकेत

सरपंच हत्या प्रकरणी फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now