मोदींकडून कौतुक, तरी रोहित आर्यने मुलांना ओलीस का ठेवले?; एन्काऊंटरमागील धक्कादायक कारण आलं समोर

On: October 31, 2025 1:17 PM
Rohit Arya Encounter Case
---Advertisement---

Rohit Arya Encounter | मुंबईच्या (Mumbai) पवई (Powai) परिसरात गुरुवारी घडलेल्या ओलीस नाट्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. वेबसीरीजच्या ऑडिशनसाठी आलेल्या १७ मुलांना डांबून ठेवणारा आरोपी रोहित आर्य (Rohit Arya) हा पोलिसांच्या चकमकीत (Encounter) ठार झाला. मात्र, ज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एकेकाळी कौतुक केले होते, अशा व्यक्तीवर मुलांना ओलीस ठेवण्याची वेळ का आली? यामागे सरकारी थकबाकी हे धक्कादायक कारण समोर आले आहे.

२ कोटींची थकबाकी आणि उपोषणाचा मार्ग

रोहित आर्य (Rohit Arya) हा ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या सरकारी अभियानाचा समन्वयक होता. याअंतर्गत त्याने ‘पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्प’ राबवला, ज्याद्वारे राज्यभरातील शाळांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्याचे काम केले जात होते. या अभियानासाठी शिक्षण विभागाने २ कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, रोहितचा (Rohit Arya) गंभीर आरोप होता की, त्याने स्वतःच्या पैशातून हा प्रकल्प पूर्ण करूनही शिक्षण विभागाने ही २ कोटींची थकबाकी दिली नाही, केवळ आश्वासने दिली.

ही थकबाकी मिळावी यासाठी रोहितने (Rohit Arya) यापूर्वी सनदशीर मार्गानेही लढा दिला होता. त्याने जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषणही केले होते. उपोषणादरम्यान त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयातही दाखल करावे लागले होते.

Rohit Arya Encounter | मोदींनी कौतुक केलेला ‘लेट्स चेंज’ उपक्रम आणि अखेरचा थरार

रोहित आर्य (Rohit Arya) हा २०१३ पासून ‘लेट्स चेंज’ (Let’s Change) या नावाने स्वच्छता अभियान राबवत होता. हाच प्रकल्प २०२२ मध्ये दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी महाराष्ट्रात ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाअंतर्गत सुरू केला होता.

सरकारी विभागाकडून पैसे मिळत नसल्याने हतबल झालेल्या रोहितने (Rohit Arya) गुरुवारी पवईतील (Powai) स्टुडिओत ऑडिशनसाठी आलेल्या १७ मुलांना ओलीस धरले. शिक्षण विभागाकडून पैसे मिळवण्यासाठी त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे व्हिडिओत म्हटले. माहिती मिळताच मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि कमांडोंनी कारवाई करत मुलांची सुखरूप सुटका केली. मात्र, यादरम्यान झालेल्या चकमकीत रोहितच्या छातीत गोळी लागली आणि रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.

News title : Rohit Arya Encounter: Praised By Modi, Why?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now