‘गोळी मारायचीच होती, तर ती पायावर…’; रोहित आर्य प्रकरणाला नवं वळण

On: October 31, 2025 1:44 PM
Rohit Arya
---Advertisement---

Rohit Arya | मुंबईतील (Mumbai) पवई (Powai) येथील ओलीस नाट्य आणि रोहित आर्य (Rohit Arya) एन्काऊंटर प्रकरणाला आता नवे कायदेशीर वळण लागले आहे. ॲडव्होकेट नितीन सातपुते (Advocate Nitin Satpute) यांनी हा एन्काऊंटर ‘बनावट’ असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. पोलिसांना एपीआय अमोल वाघमारे (API Amol Waghmare) यांना ‘हिरो’ व्हायचे होते, म्हणूनच त्यांनी रोहितच्या छातीत गोळी मारून त्याला ठार केले, असा गंभीर आरोप सातपुते यांनी केला आहे.

‘हा एन्काऊंटर टाळता आला असता’ :

ॲडव्होकेट सातपुते (Nitin Satpute) यांनी पोलिसांच्या कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “रोहित आर्यकडे (Rohit Arya) पिस्तुल होते की नाही, याबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत पत्रक काढलेले नाही. डीसीपी दत्ता नलावडे (DCP Datta Nalawade) यांनीही तपास करू असे म्हटले आहे. जरी त्याच्याकडे गन असली, तरी ती छऱ्याची बंदूक (Air Gun) होती, जी जीवघेणी नसते. अशा परिस्थितीत गोळीबार करण्याची गरज नव्हती,” असे सातपुते म्हणाले.

“पोलिसांना गोळी मारायचीच होती, तर ती पायावर किंवा हातावर मारून मुलांना सुरक्षित बाहेर काढता आले असते. पोलिसांना अशा परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण असते. पोलीस म्हणतात की, त्यांनी पायावरच गोळी मारली, पण तो खाली वाकल्याने ती छातीत घुसली. हे स्पष्टीकरण खोटे असून, शेंबडा मुलगाही यावर विश्वास ठेवणार नाही. एपीआय वाघमारे (Amol Waghmare) यांना हिरो व्हायचे असल्यानेच हा खून केला गेला,” असा थेट आरोप सातपुते यांनी केला.

Rohit Arya | ‘सरकारने परिस्थिती निर्माण केली, बोलू का दिले नाही?’ :

ॲडव्होकेट सातपुते यांनी या संपूर्ण प्रकरणासाठी राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. “रोहित आर्य (Rohit Arya) हा दहशतवादी नव्हता, तो सरकारचीच ‘स्वच्छता मॉनिटर’ (Swachhata Monitor) अभियानाची कामे करत होता. त्याचे दोन कोटी रुपये सरकारने थकवले होते, म्हणूनच त्याने उपोषण केले आणि अखेरीस हे टोकाचे पाऊल उचलले.”

“रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना डीसीपी दत्ता नलावडे (Datta Nalawade) त्याच्याशी बोलत होते. रोहितला (Rohit Arya) मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याशी बोलायचे होते. मग पोलिसांनी त्याला बोलू का दिले नाही? किंवा त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क का साधला नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “पोलिसांचे अपयश लपवण्यासाठी हा बनावट एन्काऊंटर घडवला. याविरोधात मी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) रीट याचिका दाखल करणार आहे,” असे सातपुते यांनी स्पष्ट केले.

News title : Rohit Arya Encounter Fake?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now