Eknath Khadse Home Robbery | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील निवासस्थानी मध्यरात्री चोरट्यांनी धाड टाकली आहे. घरातील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील कपाटे उघडली. पहाटे घरकामगार साफसफाईसाठी आल्यावर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी सुरू केली आहे. (Eknath Khadse Home Robbery)
चार सोन्याच्या अंगठ्या आणि रोख रक्कम लंपास :
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे हे बाहेरगावी गेले होते. त्या काळात त्यांच्या घरातील सुरक्षा रक्षक सुट्टीवर असल्याची माहिती मिळाली. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटांमधील सामान अस्ताव्यस्त केले. खडसे यांच्या खोलीतून 5 ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या अंगठ्या आणि सुमारे 35 हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.
दरम्यान, रक्षा खडसे यांच्या खोलीतही चोरी झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या कपाटातून सुमारे सात ते आठ तोळ्याचे सोने चोरीला गेले असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी घरातील ठिकठिकाणी फिंगरप्रिंट्स आणि CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
Eknath Khadse Home Robbery | एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया आणि मागील घटना :
या घटनेवर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे म्हणाले, “रात्री केव्हा चोरी झाली हे सांगता येणार नाही. सकाळी घरकामगार आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. वॉचमन सुट्टीवर होता. पोलिसांना माहिती दिली असून तपास सुरू आहे.”
अलीकडेच रक्षा खडसे यांच्या मा
लकीच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर दरोडा पडला होता, ज्यामुळे खडसे परिवार मागील काही दिवसांपासून अडचणीत आहे. या चोरीनंतर पोलिसांनाच थेट आव्हान मिळाले असून, शहरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.






