RJ सिमरनच्या आत्महत्येबाबत मोठी अपडेट समोर!

On: December 27, 2024 3:25 PM
RJ Simran Singh
---Advertisement---

RJ Simran Singh l सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या RJ सिमरन सिंगने धक्कादायक पाऊल उचललं आहे. RJ सिमरनने भाड्याच्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. ती एक फ्रिलान्स आरजे होती. तसेच जम्मू काश्मीरमध्ये तिचे लाखो चाहते आहेत. अशातच तिने आत्महत्या केली आहे. मात्र तिच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण काय? असा सवाल तिच्या चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र आता सिमरनच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी महत्त्वाची माहिती दिली आहे.

RJ सिमरनच्या आत्महत्येचं कारण काय? :

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमरन गेल्या काही दिवसांपासून तणावात होती. त्यामुळेच तिने आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे. तसेच तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत कोणाविरोधात तक्रार देखील दाखल केलेली नाही. कारण सिमरनच्या कुटुंबांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही.

सिमरन सोशल मीडियावर ‘जम्मू की धडकन’ म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र बुधवारी रात्री आत्महत्या केल्याचे समोर आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच चाहत्यांकडून देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

RJ Simran Singh l पोलीस आत्महत्येचा तपास करणार? :

दरम्यान, गुरुग्राम पोलिस आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच आता पोलीस सिमरनचे कुटुंबीय तसेच तिच्या मित्रांची देखील चौकशी करणार आहेत. याशिवाय तिच्या मोबाईली देखील तपासणी होणार आहे. कारण या तपासणीमधून तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकेल, अशी पोलिसांना आशा आहे.

सिमरन सिंग सोशल मीडियावर खूपचं लोकप्रिय होती. इंस्टाग्रामवर तिचे 7 लाख 12 हजार फॉलोअर्स आहेत. सिमरन रेडियो मिर्ची सारख्या प्रतिष्ठित रेडियो चॅनेलवर आरजे म्हणून काम करून प्रसिद्ध झाली होती. 2021 मध्ये तिने नोकरी सोडल्यानंतर ती फ्रीलान्सिंग आणि मनोरंजक व्हिडिओ बनवण्याचे काम करीत होती.

News Title : RJ simran singh suicide gurgaon

महत्वाच्या बातम्या –

संतोष देशमुखांच्या आरोपींना अटक का नाही?; अजितदादांना राष्ट्रवादीच्याचं आमदाराचा सवाल

बीडच्या घटनेची पुनरावृत्ती! धाराशिवच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला

पुण्यात ठेकेदारवर कुऱ्हाडीने हल्ला, कारण वाचून थक्क व्हालं

जानेवारीत तब्बल 16 दिवस बँका बंद राहणार; पाहा सुट्ट्यांची यादी

डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now