रवींद्र जडेजाच्या पत्नीकडे एकूण संपत्ती किती? माहिती आली समोर

On: October 20, 2025 3:57 PM
Rivaba Jadeja Net Worth
---Advertisement---

Rivaba Jadeja Net Worth | टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू (Ravindra Jadeja) यांची पत्नी रिवाबा जडेजा या सध्या गुजरातच्या (Gujarat) राजकारणात चर्चेत आहेत. नुकत्याच झालेल्या भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळ 2.0 मध्ये रिवाबा यांचा समावेश झाला असून त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. क्रिकेट आणि राजकारण या दोन क्षेत्रात जडेजा दांपत्याचा ठसा कायम राहिला आहे.

राजकीय प्रवास आणि संपत्तीचा खुलासा :

रिवाबा जडेजा यांनी 2022 मध्ये जामनगर उत्तर (Jamnagar North) मतदारसंघातून भाजपच्या (BJP) तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवून विजय मिळवला होता. त्या वेळी त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या मालमत्तेचा तपशील दिला होता. 1990 साली गुजरातमधील राजकोट (Rajkot) येथे जन्मलेल्या रिवाबा या मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवीधर आहेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर राजकीय क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली.

Myneta.com या वेबसाइटवर उपलब्ध माहितीप्रमाणे, रिवाबा यांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता सुमारे 97.35 कोटी रुपये इतकी आहे. यात त्यांच्या वैयक्तिक आणि पती रवींद्र जडेजा यांच्या नावावरील संपत्तीचा समावेश आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या कुटुंबावर कोणतेही कर्ज नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

Rivaba Jadeja Net Worth | संपत्तीचे तपशील आणि आश्चर्यकारक बाबी :

रिवाबा यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या नावावर सुमारे 4 लाख रुपयांची रोख रक्कम आणि दोन बँक खात्यांमध्ये 11 हजार रुपयांच्या ठेवी आहेत. त्यांच्या पती रवींद्र जडेजा यांच्या खात्यांमध्ये 13 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम आहे, तर कुटुंबातील आणखी एका सदस्याच्या खात्यात तब्बल 26 कोटी रुपयांची रक्कम नोंदवली गेली आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे, एवढी प्रचंड संपत्ती असूनही रिवाबा यांच्या नावावर एकही गाडी नाही. त्यांनी कोणतीही विमा पॉलिसी किंवा शेअर बाजारातील गुंतवणूक केलेली नाही. दागिन्यांमध्ये मात्र त्यांच्याकडे 5.6 दशलक्ष रुपये किमतीचं सोनं-हिऱ्यांचे दागिने आणि 15 किलो चांदी आहे. दुसरीकडे रवींद्र जडेजाकडे ऑडी, फोर्ड एंडेव्हर आणि पोलो जीटीसारखी गाड्या आहेत.

निवडणूक आयोगाला सादर केलेल्या मालमत्ता अहवालात रिवाबा यांनी नमूद केले आहे की, त्यांच्या नावावर ना शेतजमीन आहे, ना व्यावसायिक इमारत. इतकंच नव्हे तर स्वतःचं घरही त्यांच्या नावावर नाही. मात्र, रवींद्र जडेजा यांच्या मालकीची स्थावर मालमत्ता तब्बल 33 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचं या अहवालात नमूद आहे.

News Title: Rivaba Jadeja’s ₹100 Crore Net Worth

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now