नात्यात लग्न करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

On: June 17, 2025 6:34 PM
inter-caste marriage
---Advertisement---

मुंबई | गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या समाजात नात्यांमधील विवाहाची परंपरा रूढ आहे. विशेषतः मामाच्या मुलीशी किंवा इतर जवळच्या नात्यांतील व्यक्तींशी विवाह करण्याची पद्धत काही समाजांमध्ये आजही पाहायला मिळते. मात्र, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की, अशा नात्यातील विवाहांमुळे जन्माला येणाऱ्या बाळाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता अधिक असते.

आरोग्य साक्षरतेच्या वाढत्या जागृतीमुळे नात्यातील विवाहांचे प्रमाण काहीसे घटले असले, तरी अजूनही ते संपूर्णपणे थांबलेले नाहीत. नात्यातील विवाहांमुळे बाळाच्या आरोग्यावर अनुवांशिक विकृती (genetic disorders) किंवा इतर आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तज्ज्ञांनी अनेकवेळा अशा पद्धतीचे विवाह टाळावे असा सल्ला दिला आहे. मात्र, जर नात्यात विवाह झाला असेल, तर गर्भधारणेदरम्यान आवश्यक आणि सखोल चाचण्या कराव्यात. यात विशेषतः बाळाची रक्तचाचणी केल्यास संभाव्य व्याधींवर लवकर निदान होऊन उपचार करणे शक्य होते, ज्यामुळे बाळाचे आरोग्य धोक्यात येण्यापासून वाचवता येते.

गेल्या काही वर्षांत वैद्यकीय तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे आता गर्भात वाढणाऱ्या बाळामध्ये कोणत्याही गंभीर व्याधी किंवा अनुवांशिक दोष असल्यास ते गर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखणे शक्य झाले आहे. अशा स्थितीत, जर त्या व्याधीमुळे बाळाचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता असेल, तर वैद्यकीय सल्ल्यानुसार गर्भपात करण्याचा पर्याय निवडता येतो. मात्र, गर्भपात केवळ विशिष्ट आठवड्यांच्या आतच कायदेशीररीत्या करता येतो. सध्या भारतात गर्भपातासाठी वैद्यकीय परवानगी २० ते २४ आठवड्यांपर्यंत आहे. काही गंभीर वैद्यकीय परिस्थितींमध्ये त्यानंतरही गर्भपात करता येतो, परंतु त्यासाठी न्यायालयाची मंजुरी घेणे बंधनकारक आहे.

‘थॅलेसिमिया’ एक गंभीर आनुवंशिक आजार

नात्यात विवाह झाल्यास सर्वाधिक आढळणारा गंभीर आनुवंशिक आजार म्हणजे ‘थॅलेसिमिया’. हा एक रक्तविकार असून, यामध्ये शरीरातील हिमोग्लोबिन (hemoglobin) योग्यप्रकारे कार्य करत नाही. या आजाराने बाधित मुलांना दर ४ ते ६ आठवड्यांनी रक्त चढवावे लागते. त्यामुळे अशा मुलांची विशिष्ट रक्तपेढीत नोंदणी करून त्यांना नियमित रक्त द्यावे लागते. थॅलेसिमियाव्यतिरिक्तही इतर अनेक अनुवांशिक व्यंग अशा बाळांमध्ये दिसून येऊ शकतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम होतो. या मुलांसाठी दीर्घकालीन उपचारांची गरज असून, काही प्रकरणांमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट (Bone Marrow Transplant) हाही पर्याय वापरला जातो. हा उपचार खर्चिक असला तरी, बरेच पालक आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी तो मार्ग अवलंबतात.

डॉक्टरांचा सल्ला

नात्यातील विवाहानंतर गर्भधारणा झाल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांच्या मते, अशा विवाहांमध्ये बाळाला थॅलेसिमिया, डाऊन सिंड्रोम (Down Syndrome) किंवा इतर अनुवांशिक विकृती होण्याची शक्यता अधिक असते. गर्भधारणेच्या सुरुवातीला केलेली रक्तचाचणी आणि सखोल सोनोग्राफी (ॲनोमली स्कॅन – Anomaly Scan) करून बाळाच्या आरोग्यस्थितीचा अंदाज घेता येतो. डॉक्टरांच्या सल्लानुसार वेळेवर निदान केल्यास गंभीर निर्णय घेणे सोपे जाते, तसेच भविष्यातील गुंतागुंत टाळता येते.

News Title- Risk to Baby’s Health, Even During Pregnancy

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now