गुइलेन बॅरे सिंड्रोम होण्याची कारणे, जाणून घ्या A टू Z माहिती

On: January 25, 2025 4:20 PM
Guillain-Barré Syndrome
---Advertisement---

Guillain-Barré Syndrome l महाराष्ट्रात गुइलेन बॅरे सिंड्रोम या दुर्मिळ आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत एकूण ७३ रुग्ण सापडले असून, यातील ७० रुग्ण एकट्या पुणे जिल्ह्यात (Pune District) आहेत, तर उर्वरित ३ रुग्ण इतर जिल्ह्यांतील आहेत. महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने (Public Health Department) ही माहिती दिली आहे. या रुग्णांपैकी १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर (Ventilator) असल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.

आरोग्य विभागाकडून लक्षणे आणि काळजी घेण्याबाबत सूचना :

महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने या आजाराची लक्षणे आणि नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबद्दल एका पत्रकाद्वारे सविस्तर माहिती दिली आहे. अचानक पायातील किंवा हातातील येणारी कमजोरी/लकवा, अचानकपणे उद्भवलेले चालण्यातील त्रास/कमजोरी आणि डायरिया (जास्त दिवसांचा) ही तीन प्रमुख लक्षणे या पत्रकात नमूद करण्यात आली आहेत.

आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पिण्याचे पाणी दूषित राहणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. त्यासाठी पाणी उकळून प्यावे. तसेच, अन्न स्वच्छ आणि ताजे असावे. वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्र न ठेवल्यास संसर्ग टाळता येईल, असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.

गुइलेन बॅरे सिंड्रोम: एक दुर्मिळ आजार :

गुइलेन बॅरे सिंड्रोम हा नेमका काय आजार आहे, हे समजून घेऊया. आपल्या शरीरावर एखाद्या रोगाने हल्ला केला तर आपली रोगप्रतिकार शक्ती (Immune System) शरीराचा बचाव करते. परंतु, गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक असा दुर्मिळ आजार आहे, ज्यात हीच रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्याच शरीरावर हल्ला चढवते.

गुइलेन बॅरे सिंड्रोम नावाचा इतिहास :

१९६१ मध्ये युरोपातील (Europe) ‘बॅटल ऑफ द सॉम’ (Battle of the Somme) मध्ये दोन सैनिक पॅरलाईझ (Paralyzed) झाले होते. एका विशिष्ट कारणामुळे असे झाल्याचा निष्कर्ष गुइलेन , बारे आणि स्ट्रोहल या तीन फ्रेंच लष्करी न्यूरोलॉजिस्टनी (French Military Neurologists) काढला होता. याच आजाराला आज गुइलेन बॅरे सिंड्रोम (Guillain-Barré Syndrome किंवा GBS) म्हणून ओळखले जाते.

गुइलेन बॅरे सिंड्रोम होण्याची कारणे :

हा रोग अतिशय दुर्मिळ आहे. साधारण ७८ हजार लोकांमागे एकाला हा सिंड्रोम होतो. हा सिंड्रोम होण्याची नेमकी कारणे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नाहीत. परंतु, बहुतांश प्रकरणांमध्ये एखाद्या विषाणू (Virus) किंवा बॅक्टेरियाच्या (Bacteria) संसर्गानंतर हा आजार होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती शरीरावर हल्ला करते, असे दिसून आले आहे.

Campylobacter Jejuni सारख्या जीवाणूंच्या (Bacteria) संसर्गामुळे गॅस्ट्रोएन्टेरायटिस (Gastroenteritis) हा आजार होतो. यामध्ये मळमळणे, उलट्या होणे आणि जुलाब होणे अशी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे गुइलेन बॅरे सिंड्रोम मध्येही आढळतात. काही फ्लू (Flu) किंवा विषाणूजन्य संसर्गानंतर (Viral Infection) देखील गुइलेन बॅरे सिंड्रोम होण्याची शक्यता असते.

इतर दुर्मिळ कारणे :

काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये, झिका (Zika), चिकनगुनिया (Chikungunya) झाल्यानंतर, लसीकरणानंतर (Vaccination), शस्त्रक्रियेनंतर (Surgery), एखाद्या वैद्यकीय प्रक्रियेनंतर (Medical Procedure) किंवा दुखापतीनंतर (Injury) देखील GBS होण्याची शक्यता असते.

News Title : Rise in Guillain-Barré Syndrome Cases in Maharashtra

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now