केकेआरचा तुफानी फलंदाज आरसीबीमध्ये जाणार? काय आहे यामागचं कारण

On: August 20, 2024 3:35 PM
Rinku Singh
---Advertisement---

Rinku Singh l क्रिकेटप्रेमींनो आयपीएल संदर्भात एक मोठी अपडेट्स समोर आली आहे. रिंकू सिंगने आपल्या आयपीएल करिअरची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्समधून केली होती. 2018 मध्ये कोलकाताने त्याला 10 लाख रुपये देऊन संघात समाविष्ट केले. यानंतर तो फक्त केकेआरकडेच राहिला. रिंकू तब्बल 6 वर्षांपासून शाहरुख खानच्या टीम सोबत जोडला गेला आहे. अशातच आता त्यानी एक मोठं वक्तव्य केलं आहे

रिंकू सिंगने केलं मोठं वक्तव्य :

मेगा लिलावापूर्वी रिंकू सिंगने एक मोठं वक्तव्य केल आहे. रिंकू म्हणाला आहे की, जर कोलकाता नाईट रायडर्सने त्याला सोडले तर त्याला आरसीबीकडून खेळायला आवडेल. 2023 साली KKR कडून खेळताना रिंकू सिंगने शेवटच्या षटकात 5 चेंडूत तब्बल 5 षटकार मारून सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. या पराक्रमामुळे त्याला देशभरात ओळख मिळाली आणि काही महिन्यांनंतर त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली. एवढेच नाही तर खेळाडू रिंकू सिंगने आतापर्यंत KKR च्या टीमकडून सुमारे साडेचार कोटी रुपये देखील कमावले आहेत. असे असूनही, तो म्हणाला की केकेआरने त्याला सोडले तर त्याला आरसीबीकडून खेळायला आवडेल.

रिंकूने यामागचे मोठे कारण सांगितले. तो म्हणाला की आरसीबीकडून खेळण्याचे सर्वात मोठे कारण विराट कोहली आहे. तो त्यांना खूप आवडतो. यावेळी रिंकू सिंगने रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवबद्दलही बोलले. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा अतिशय शांत आणि संयमी कर्णधार आहे. तसेच सूर्यकुमार यादव देखील शांत कर्णधार आहे.

Rinku Singh l रिंकूने इंटरनॅशनलमध्ये 1 वर्ष पूर्ण केले :

रिंकू सिंगने 18 ऑगस्ट 2023 रोजी आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आता एक वर्ष उलटले आहे. तेव्हापासून रिंकू आपल्या कामगिरीच्या जोरावर सतत टीम इंडियाशी जोडला गेला आहे. टी-20 विश्वचषकातही त्याला राखीव म्हणून ठेवण्यात आले होते. रिंकू सिंगने आतापर्यंत तब्बल 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानी 59 च्या सरासरीने आणि 174 च्या स्ट्राईक रेटने तब्बल 418 धावा पूर्ण केल्या आहेत.

रिंकूने 2 एकदिवसीय सामन्यात 55 धावा केल्या आहेत. रिंकूने आयपीएलमध्ये तब्बल 45 सामने खेळले आहेत, त्यामध्ये रिंकूने 30 च्या सरासरीने आणि 143 च्या स्ट्राइक रेटने 893 धावा केल्या आहेत.

News Title : Rinku Singh Want To Join RCB

महत्त्वाच्या बातम्या- 

वरुण ‘यू लव्ह आय’; पण मला मुली आवडत नाहीत?

बदलापूर अत्याचार प्रकरणी सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय!

पुढील काही तास धोक्याचे! ‘या’ जिल्ह्यांना IMD कडून यलो अलर्ट जारी

बदलापूर स्टेशनवर आंदोलक आक्रमक; पोलिसांवर दगडफेक

… तर नराधमांना एकदा तरी पब्लिकली फाशी द्यावी, सुप्रिया सुळे संतापल्या

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now