गौतमी पाटीलने केला धक्कादायक गौप्यस्फोट! रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी मागितले ‘इतके’ लाख रुपये

On: October 8, 2025 7:50 PM
Gautami Patil Controversy
---Advertisement---

Gautami Patil Controversy | पुण्यातील रिक्षा अपघात प्रकरणी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्यावर काही दिवसांपासून गंभीर आरोप सुरू होते. या अपघातात तिच्या कारचालकाने रिक्षाचालकाला धडक दिली होती. रिक्षाचालकांच्या कुटुंबीयांनी गौतमीवर मदत न केल्याचा आरोप केला होता, पण अखेर गौतमीने पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली.

कुटुंबीयांची 20 लाखांची मागणी :

रिक्षाचालक कुटुंबीयांना अपघातााच्या दिवशी दुपारीच मदत पुरवली होती. मात्र त्यांनी मदत नाकारत 19-20 लाख रूपयाची मागणी केल्याचा खळबळजनक दावा गौतमी पाटीलने केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत गौतमीने ही माहिती दिली आहे. पोलिसांनी अपघाताचे सर्व सीसीटीव्ही तपासले आणि त्यामध्ये गौतमी कारमध्ये नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तिला क्लिन चीट देण्यात आली. (Gautami Patil Controversy)

गौतमी म्हणाली, “माझी काही चूक नसताना मला गुन्हेगार ठरवलं जात आहे. माझा या घटनेची काही संबध नाही पोलिसांनी ही हे सांगितले आहे. त्या कुटुंबाला मदत देण्यासाठी माझे भाऊ गेले होते, पण त्यांनी मदत नाकारली आहे. अपघातग्रस्त कुटुंबांच्या नातेवाईकाकडून वेगवेगळ्या प्रकारची मागणी करण्यात येत आहे. कुणी 19 लाख तर कुणी 20 लाख रुपये मागितले जात होते. आता कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याने सगळं कायद्यानेच होणार आहे.” असेही तिने सांगितले.

Gautami Patil Controversy | ड्रायव्हरची चूक गौतमीने केली मान्य :

तिने पुढे सांगितले की, तिच्या चालकाची चूक मान्य आहे, पण त्या वेळी मदत करणे गरजेचे होते. घटना घडल्यानंतर ती मुंबईत होती आणि चालकाशी तिचे अजून बोलणे झालेले नाही. सगळ्या माहिती पोलिसांना दिली गेली आहे आणि आता प्रकरण कायदेशीर मार्गाने हाताळले जाईल.

माझा या घटनेची काही संबंध नाही, पोलिसांनी देखील हे सांगितले आहे. त्या कुटुंबाला मदत देण्यासाठी माझे भाऊ गेले होते पण त्यांनी मदत नाकारली. पोलिसांनी जेव्हा बोलवले तेव्हा त्यांना सहकार्य केले आहे आणि करणार आहे. चंद्रकातदादांनी ते वक्तव्य केलं त्यामुळे मला वाईट वाटलं, पण सगळेच माझ्या बाबतीत बोलतात. सगळे मला वाईटच बोलतात. मला सातत्याने ट्रोल केले जात आहे. मी नाचले तरी वाईट होते आणि नाही नाचले तरी वाईटच आहे . मी जर त्या वेळी तिथे असते तर नक्कीच मी हे प्रकरण वाढवून दिले नसते. आता जे काही कायदेशीर आहे त्यानुसार चालेल, असे गौतमीने सांगितले. (Gautami Patil Controversy)

गौतमीने आपल्या वक्तव्यात भावनिकपणे सांगितले की, सातत्याने ट्रोलिंग होत असून, शो बंद पडल्यास अनेक लोकांवर परिणाम होईल. त्यामुळे ती या प्रकरणात कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करेल, असे तिने स्पष्ट केले.

News Title : Rickshaw Driver’s Family Demanded a Whopping ₹20 Lakh; Gautami Patil Breaks Her Silence

Join WhatsApp Group

Join Now