Weather update | राज्यात परतीच्या पावसाचा उद्रेक दिसून येत आहे. त्यामुळे खानदेश, मराठवाडा, आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये अशा मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा परिसरात मागील २४ तासांत तब्बल १४३ मिमी पाऊस पडला असून नदी-नाल्यांना पुराचे स्वरूप आलेत तर घरे, दुकाने आणि शेतामध्येही पाणी शिरलं आहे. (Maharashtra Weather update)
या पावसाचा सर्वात जास्त फटका जळगाव, धाराशिव, अहिल्यानगर, जालना, बीड, आणि सोलापूर राज्यांना बसला आहे. वाढत्या पावसामुळे लोकांना जीवितहानी होत आहे. मराठवाड्यातील चार तर जळगावातील एका नागरिकासह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या शहरात एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफच्या पथकाकडून मदतकार्य सुरू आहे.
पूरस्थिती गंभीर, बचावपथके कार्यरत :
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा महसूल मंडळात मागील आठ तासांत १४७ मिमी पाऊस झाला. यामुळे पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव (Chalisgoan) तालुक्यांना या पुराचा मोठा फटका बसला. दहिगाव येथे असलेल्या गिरणा नदीला पूर आल्याने पाचोरा गावासोबत संपर्क तुटला, तर पारोळ्यामधील चोरवड परिसरात अंजनी नदीला पूर आल्याने गावात पाणी शिरलं.
धाराशिव जिल्ह्यामध्ये असलेल्या परांडा (Paranda) तालुक्यामधील लाची गावाला पुराचा गंभीर फटका बसला असून, तेथील स्थानिकांना एअरलिफ्टच्या साह्याने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या भागात एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील पाथर्डी, जामखेड, कर्जत, या तालुक्यांमध्ये ही मदत कार्य सुरू आहे.
Weather update | सरासरी पावसाचा टप्पा एक हजार मिमीवर :
नवरात्रीपासून (Navratri 2025) पावसाने जोर धरला असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे दोन पट्टे निर्माण झाल्याने राज्यात मुसळधार पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात १ जून ते २२ सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा २२ टक्के अधिक पाऊस पडला असून, सरासरी पावसाचा टप्पा एक हजार मिमीवर पोहोचला आहे. (Maharashtra Weather update)
दरम्यान, नाशिक शहरात सोमवारी दोन ते अडीच तासांत ३७ मिमी पाऊस नोंदवला गेला. यामुळे कालिका यात्रेतील व्यापारी तसेच दांडीयासाठी आलेल्या नागरिकांची धांदल उडाली.
अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत :
परतीच्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत केले आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रशासनाचे काम चालू असून, नागरिकांना सतर्कतेचे आव्हान केले आहे.
मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहेतच पण, ७२ जनावरे सुद्धा दगावली आहेत. पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
News title :






