खळबळजनक; बीडच्या जेलमध्ये चालते धर्मांतराचे रॅकेट; आमदार गोपीचंद पडळकरांचा मोठा आरोप

On: October 6, 2025 6:05 PM
Gopichand Padalkar
---Advertisement---

Gopichand Padalkar | भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalakar) यांनी बीडच्या (Beed) कारागृहातील अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की बीड जिल्हा कारागृहात धर्मांतराचे काम सुरू आहे. कारागृहातून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे फोटो काढून टाकण्यात आले असून, त्यांच्या जागी बायबलमधील श्लोक लिहिण्यात आले आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

शिवाजी महाराजांची मूर्ती टाकली काढून : पडळकर 

पडळकर यांनी पुढे सांगितले की, “बीडचे जे तुरुंग अधिकारी आहेत तिकडे ते धर्मांतराचं काम करत आहेत. तिकडे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि गणपतीची मूर्ती होती, ती काढून टाकलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, महात्मा गांधींचा फोटो काढून टाकलेला आहे. ते सर्व फोटो एका खोलीत टाकलेले आहेत. जेलमध्ये सगळे बायबल मधले श्लोक लिहिले आहेत. कैदी जेलमध्ये भजन कीर्तन करायचे, ते भजन कीर्तन पूर्णपणे बंद करून टाकलेल आहे. तसेच कैद्यांना तुम्ही धर्मांतर करा तुम्हाला लाखो रुपये देतो अशा प्रकारची भूमिका तुरुंग अधिकारी घेत आहेत.”

या प्रकरणाची सविस्तर माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना देण्यात आली असून, पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन तपासाची मागणी केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या आधारे चौकशी करावी आणि त्या अधिकाऱ्याला बडतर्फ करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Gopichand Padalkar | सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरभरती घोटाळा :

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीबाबतही गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली. पडळकर म्हणाले की, “सांगली बँकेतील चालू चौकशी निवृत्त न्यायाधीश किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून व्हावी”, अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यांनी आरोप केला की, “सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत मागच्या वेळेस नोकर भरती घोटाळा झाला होता. त्या घोटाळ्याची चौकशी करावी आणि नव्याने नोकर भरती व्हावी अशी मागणी केलेली आहे. शेतकरी सहकारी सूतगिरणी यात देखील आर्थिक घोटाळा झालेला आहे. त्याबद्दल गुन्हा दाखल करावा अशी तिसरी मागणी केलेली आहे.”

पूरग्रस्तांना कारखानदारांनी मदत करावी : पडळकर

पडळकर यांनी सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना कारखानदारांनी मदत करावी, अशी भूमिका घेतली आहे. या निर्णयाचे समर्थन करताना गोपीचंद पडळकर म्हणाले,
“मुख्यमंत्र्यांनी अतिशय योग्य भूमिका घेतली आहे. कारखानदारांना सरकारकडून 10,000 कोटी रुपयांची मदत मिळते. मग जेव्हा शेतकऱ्यांवर संकट येतं, तेव्हा कारखानदारांनीही पुढे येऊन उभं राहायला हवं. सरकारकडून मदतीची अपेक्षा ठेवून संकटाच्या वेळी मागे हटणं योग्य नाही,” असे ते म्हणाले.

News Title:- Shocking Revelation: Religious Conversion Racket in Beed Jail; Major Allegation by MLA Gopichand Padalkar

Join WhatsApp Group

Join Now