शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याला मोठा दिलासा; कथित भूखंड घोटाळा केस बंद

On: November 16, 2024 10:11 AM
Relief to Ravindra Waikar in Jogeshwari Plot Scam case  
---Advertisement---

Ravindra Waikar | राज्यात विधानसभेची धामधूम सुरू असतानाच शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा (Jogeshwari Plot Scam) प्रकरणाची फाइल आता बंद करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने वायकर यांच्याविरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे अहवालात नमूद केले आहे. (Ravindra Waikar )

वायकर यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. त्यांच्यावर मुंबईतील जोगेश्वरी येथील सुप्रिमो क्लबचा गैरवापर करून तिथे हॉटेल्स बांधताना माहिती लपवल्याचा आरोप होता. इतकंच नाही तर, त्यांनी हे सगळं करत असताना बनावट माहितीच्या आधारे महापालिकेकडून विविध परवानग्या देखील घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात याप्रकरणी आरोप होता. आता हे प्रकरणच बंद करण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने हे प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल न्यायालयात दाखल केलाय. हा अहवाल महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मान्य केलाय. त्यामुळे वायकर यांना मोठा दिलासा मिळालाय. (Ravindra Waikar )

नेमकं प्रकरण काय?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्यावर आरोप केले होते. मुंबईतील जोगेश्वरी येथील भूखंडाचा गैरवापर करुन त्याजागी हॉटेल बांधल्याचा वायकर यांच्यावर आरोप होता. तसेच, त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. (Ravindra Waikar )

आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी वायकरांना ईडीकडून देखील समन्स बजावण्यात आलं होतं. आता हे प्रकरणच बंद झाले आहे. मुंबई महापालिकेने रवींद्र वायकर यांच्या विरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचं नुकत्याच सादर केलेल्या अहवालात नमूद केलं आहे.

News Title : Relief to Ravindra Waikar in Jogeshwari Plot Scam case  

महत्वाच्या बातम्या –

“कदाचित उद्या माझा शेवटचा दिवस..”; आमिर खानच्या वक्तव्याने खळबळ

राज ठाकरेंना बालेकिल्ल्यातच धक्का, विश्वासू नेत्याचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश

रोहित शर्माच्या आयुष्यात ‘ज्युनिअर हिटमॅन’ची एंट्री; पत्नी रितिकाने दिला मुलाला जन्म

आज शनिदेवाच्या कृपेने ‘या’ राशींच्या मनोकामना पूर्ण होणार!

‘स्वाभिमानासाठी एकजुटीने….’; संभाजी पाटील निलंगेकरांचं मतदारांना आवाहन

Join WhatsApp Group

Join Now