फक्त 13 हजार रुपये देऊन खरेदी करा iPhone 16; जाणून घ्या ऑफर

On: October 1, 2024 2:02 PM
Reliance Digital offer on iPhone 16
---Advertisement---

Reliance Digital offer | देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आयफोन घेऊ इच्छणाऱ्यांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. आयफोन 16 सप्टेंबर महिन्यात लॉन्च झाला. हा फोन येताच त्याच्या खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. आयफोन अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई शॉपिंगच्या वेबसाईटवरसुद्धा उपलब्ध आहे. (Reliance Digital offer)

याचबरोबर मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स डिजिटलवर देखील आयफोन 16 उपलब्ध आहे. रिलायन्सने या फोनवर एक धमाकेदार ऑफर आणली आहे. या ठिकाणी बँक डिस्काऊंटसोबत नो कॉस्ट ईएमआयसुद्धा मिळत आहे. अॅपलच्या या सर्वात लेटेस्ट फोनवर रिलायन्स नेमकी काय ऑफर देत आहे, ते जाणून घेऊयात.

रिलायन्स डिजिटलवर बंपर ऑफर

आयफोन 16 च्या 128GB व्हेरिएंटची किंमत 79,900 रुपये आहे. त्यावर रिलायन्स डिजिटलमध्ये पाच हजार रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. रिलायन्स डिजिटलवर तुम्ही आयफोन घेण्यासाठी आयसीआयसीआय किंवा कोटक बँकेच्या कार्डचा वापर केला तर तुम्हाला पाच हजाराचे इंस्टेंट डिस्काऊंट मिळणार आहे.

या ऑफरमुळे आयफोनची किंमत ही 74,900 होणार आहे. त्यानंतर ‘नो कास्ट’ ईएमआयचीसुद्धा ऑफर दिली जाणार आहे. ही ऑफर सहा महिन्यांसाठी घेतली तर प्रत्येक महिन्याला 12,483 रुपये देऊन आयफोन घेता येईल. म्हणजेच तुम्हाला पहिल्यांदा फक्त 12,483 रुपये भरावे लागतील. (Reliance Digital offer)

iPhone 16 चे फीचर्स-

आयफोन 16 मध्ये अनेक नवीन फीचर्स आहेत. यामध्ये A18 चिप दिली गेली आहे. या चिपमुळे फोनच्या वेगात लक्षणीय सुधारणा झाली आहे. याचबरोबर बॅटरी देखील अधिक वेळ चालणार आहे. एकाच वेळी गेम खेळणे, फोटो घेणे अशी अनेक कामे यात करता येतील. यामध्ये फोटोसाठी उत्तम कॅमेरा देखील आहे. (Reliance Digital offer)

News Title –  Reliance Digital offer on iPhone 16

महत्वाच्या बातम्या-

सुरज चव्हाण झळकला मोठ्या पडद्यावर! चित्रपटातील रोमँटीक गाणं रिलीज

अभिनेता गोविंदाच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट समोर!

शेतकऱ्यांनो ‘ही’ गोष्ट करा; अन्यथा अनुदानाचे पैसे मिळणार नाहीत

सकाळी लायसन्स रिव्हॉल्व्हर घेऊन तो..; गोविंदाच्या मॅनेजरकडून सर्वात मोठा खुलासा!

पुणे जिल्ह्यात रात्रीचे फिरतात संशयित ड्रोन? नागरिकांमध्ये पसरली दहशद

 

Join WhatsApp Group

Join Now