बाईकवर आले, हातात 10 मोबाईल; संजय राऊतांच्या घराबाहेर काय घडलं?

On: December 20, 2024 4:16 PM
sanjay raut
---Advertisement---

Sanjay Raut l सध्या नागपूरमध्ये सुरु असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्दे गाजत आहेत. त्यामुळे राज्याचं राजकारण देखील चांगलंच तापताना दिसत आहे. अशातच मुंबईमध्ये एक मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

राऊतांच्या बंगल्याबाहेर दोन अज्ञात इसमांकडून रेकी :

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, खासदार संजय राऊत यांचा भांडुप येथे मैत्री नावाचा एक बंगला आहे. मात्र या मैत्री बंगल्याच्या बाहेर दोन अज्ञात इसमांकडून रेकी करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर रेकी करत असल्याची घटना कॅमेऱ्यात देखील कैद झाली आहे.

मात्र या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, राऊत यांच्या घराबाहेर आलेल्या दोन अज्ञात तरुणांच्या हातात आठ ते दहा मोबाईल होते. तसेच वाहनचालकाच्या हातात देखील मोबाईल होता. मात्र मागे बसलेल्या अज्ञात व्यक्तीकडे चौरशी पुठ्ठ्यावर अनेक मोबाईल दिसत आहेत. त्यामुळे आता हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे? याचा तपास पोलीस करत आहेत.

Sanjay Raut l सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली :

दरम्यान, या संपूर्ण घटनेवर संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, घटनास्थळी झोन सात मधील पोलीस विभागाची विविध पथके दाखल झाली आहेत. तसेच सीसीटीव्ही आणि आजूबाजूला देखील याप्रकरणी कसून चौकशी करण्यात येत आहे.

तसेच जी बाईक होती ती यूपी, बिहारची असल्याचं सुनील राऊत म्हणाले आहेत. कारण राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी प्रकरण घडल्यानंतर हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सुनील राऊत यांनी म्हंटल आहे.

News Title – Reiki by unknown people outside Sanjay Raut’s house

महत्त्वाच्या बातम्या-

सरपंच हत्या प्रकरणी मुख्यमंत्री ॲक्शनमोडमध्ये; सर्वात मोठा निर्णय घेतला

महायुतीकडून ‘या’ लाडक्या बहिणींना मिळाला धोका?

“वाल्मिक कराडला सोडणार नाही”; सरपंच हत्याप्रकरणी फडणवीस आक्रमक

CNG चा स्फोट अन् ‘इतके’ जण जीवंत जळाले, कुठे घडला हा भयंकर अपघात?

भाजपा म्हणजे नटरंगी नार, ‘या’ नेत्याची जहरी टीका

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now