…असं झालं तर वाहनांची किंमत तब्बल 4 लाख रुपयांनी कमी होणार

On: August 13, 2024 2:09 PM
Vehicle Fitness Fee Hike
---Advertisement---

Electric Vehicles l आजकाल नागरिक इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याला सर्वात जास्त प्राधान्य देतात. मात्र आता इलेक्ट्रिक वाहनासंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. EV धोरणांतर्गत, हायब्रीड वाहनांसह इलेक्ट्रिक वाहनांचे नोंदणी शुल्क माफ करण्याची तयारी सरकारकडून केली जात आहे. या संदर्भात आदेश जारी झाल्यानंतर हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती तब्बल 4 लाख रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.

वाहनांची ऑन रोड किंमत 4 लाख रुपयांनी कमी होण्याची शक्यता :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, यूपी सरकारने 5 जुलै रोजी प्लग-इन हायब्रिड कारवरील 8 ते 10 टक्के नोंदणी कर माफ करण्याचा आदेश जारी केला होता. त्यामुळे या गाड्यांची ऑन रोड किंमत 4 लाख रुपयांनी कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात रविवारी मुख्य सचिवांची प्रमुख वाहन उत्पादक कंपन्यांसोबत बैठक झाली. या बैठकीला परिवहनसह औद्योगिक विकास अधिकारी उपस्थित होते.

यासोबतच टाटा मोटर्स, ह्युंदाई, किया, महिंद्रा, मारुती सुझुकी, टोयोटा, होंडा आणि बजाजचे प्रतिनिधीही बैठकीत सहभागी झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन कंपन्यांना सांगण्यात आले आहे की, प्लग-इन आणि हायब्रीड कारसाठी या प्रोत्साहनाचा उद्देश इलेक्ट्रिक वाहने नव्हे तर ICE वाहने बदलणे आहे. याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, हायब्रीड आणि ईव्हीसाठी नोंदणी शुल्कावरील सवलत देखील वेगळी असू शकते.

Electric Vehicles l EV धोरण हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांना समर्थन देणार :

टाटा मोटर्स, ह्युंदाई, किया आणि महिंद्राच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे की केवळ हायब्रीड वाहनांना सूट दिल्यास इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच मुख्य सचिवांनी या बैठकीत सांगितले की, यूपीचे ईव्ही धोरण पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या जागी हायब्रीड आणि ईव्ही दोन्ही वाहनांना प्रोत्साहन देण्याचे आहे.

UP चे EV धोरण हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांना समर्थन देखील देत आहे. त्यामुळे लवकरच हायब्रीड वाहनांसह इलेक्ट्रिक वाहनांचे नोंदणी शुल्क माफ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

News Title : Registration Fee on Electric Vehicles

महत्वाच्या बातम्या-

या राशीच्या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवा अन्यथा…

Diabetes आणि BP कंट्रोलमध्ये ठेवतील ‘हे’ 5 पदार्थ; वजनही होईल कमी

‘या लोकांसोबत तुला झोपायला लागेल’, सई ताम्हणकरच्या खुलाशाने खळबळ!

“..याची किंमत मोजावी लागली”; घटस्फोटाच्या चर्चेवर अखेर अभिषेकनं सोडलं मौन

बीएसएनएल लाँच करणार 200MP कॅमेरा असलेला 5G फोन! काय आहे यामागचं सत्य

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now