राज्यासाठी पुढील ४८ तास धोक्याचे! मुसळधार पावसाचा इशारा

On: October 28, 2025 10:57 AM
Maharashtra Rain Update
---Advertisement---

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात पुढील ४८ तास हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टीवरील भागांमध्ये तीन नंबरचा लालबावटा फडकवण्यात आला असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र, समुद्र खवळलेला :

पूर्वमध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते हळूहळू किनारपट्टीकडे सरकत आहे. या प्रणालीमुळे समुद्रात उंच लाटा आणि वादळी वाऱ्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सुरक्षेच्या दृष्टीने तीन नंबरचा लालबावटा फडकवला आहे.

कोकण किनारपट्टीवरील भागांत, विशेषत: सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोवा परिसरात पुढील काही तासांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमीपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Maharashtra Weather Update | मोंथा चक्रीवादळामुळे पावसाला पोषक वातावरण :

नैऋत्य बंगालच्या उपसागरात तयार झालेलं मोंथा चक्रीवादळ सध्या वायव्य दिशेने सरकत आहे. हे वादळ मंगळवारी रात्री आंध्रप्रदेशातील काकीनाडा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या दुहेरी हवामान प्रणालीचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रात होत असून, राज्यभर पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे.

हवामान खात्यानुसार, दक्षिण कोकण, गोवा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. (Maharashtra Weather Update)

तर बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह जोरदार सरींची शक्यता आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आणि ओपन परिसर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई-पुण्यात ढगाळ वातावरण आणि मध्यम पाऊस :

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये सागरी वाऱ्यांचा प्रभाव कायम राहील. दिवसभर ढगाळ वातावरण आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुणे, नाशिक, नगर, सातारा, कोल्हापूर आणि घाटमाथ्यावरील भागांमध्ये देखील मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली आणि बीड येथे हलक्या ते मध्यम सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

News Title: Red Alert in Maharashtra: Heavy Rain and Rough Sea Expected in Next 48 Hours Due to Low Pressure and Cyclone Montha

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now