अजितदादांच टेन्शन वाढणार? युगेंद्र पवारांनी उचललं मोठं पाऊल

On: December 1, 2024 3:19 PM
Baramati
---Advertisement---

Baramati l महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पार पडली आहे. मात्र यावेळी महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. परंतु, यावेळी महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांनी EVM वर संशय घेतला आहे. अशातच अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार युगेंद्र पवार यांनी एक मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे आता अजितदादांचं टेंशन वाढणार आहे.

किती टक्के होणार फेरमतमोजणी? :

बारामती विधानसभेत पवार कुटुंबियांमध्ये लढत झाली आहे. यावेळी काका अजित पवार आणि पुतण्या युगेंद्र पवार यांची लढत राज्यभर चर्चेची ठरली आहे. मात्र या लढतीत अजित पवार विजयी झाले आहेत. त्यानंतर काकाविरुद्ध पुतण्याने पुन्हा फेरमतमोजणीचा अर्ज दिला आहे. अशातच आता युगेंद्र पवार यांनी लागणारी रक्कमसुद्धा भरली आहे. त्यामुळे आता बारामतीमध्ये 5 टक्के ईव्हीएमची फेरमतमोजणी होणार असल्याचं युगेंद्र पवार यांनी म्हंटल आहे.

Baramati l नेमकं प्रकरण काय? :

यावेळी पुणे जिल्ह्यातून 11 उमेदवारांनी पडताळणीसाठी अर्ज देखील केले आहेत. त्यासाठी 66 लाख रुपये देखील भरण्यात आले आहेत. यासंदर्भात युगेंद्र पवार म्हणाले की, आम्ही पराभूत झालो असलो तरी बारामतीकरांसाठी आम्ही काम करत आलो आहे. तसेच यापुढे देखील करत राहू असं युगेंद्र पवार यांनी म्हंटल आहे.

विधानसभा निवडणुकीबाबत संपूर्ण महाराष्ट्रात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच राज्यामध्ये दिग्गज नेते जे अनेक दशकांपासून निवडून येत आहेत त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे आम्ही पक्षाच्या बैठकीत देखील यासंदर्भात चर्चा केली आहे. त्यानंतर आम्हाला सुप्रीम कोर्टाने 5 टक्के EVM तपासायचा अधिकार देखील दिला आहे. त्यानुसार आता आम्ही पडताळणीसाठी अर्ज करणार आहोत.

News Title : Recounting of votes in Baramati assembly constituency

महत्त्वाच्या बातम्या- 

महागाईचा अजून एक धक्का! एसटी प्रवास ‘इतक्या’ टक्क्यांनी महागणार

ठाकरे गटात पुन्हा फूट पडणार? ‘या’ बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

‘पिक्चर अभी बाकी है’; युगेंद्र पवारांची मोठी मागणी, अजित पवार अडचणीत?

सर्वसामान्यांना महागाईचा झटका; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी महागला

महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची पहिली यादी समोर! कोणाला लागणार लॉटरी?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now