पुण्यात म्हाडाचं घर घेण्याची सुवर्णसंधी! ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

On: November 25, 2025 1:00 PM
MHADA Pune Lottery
---Advertisement---

MHADA Pune Lottery | पुण्यात स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळत आहे. म्हाडा पुणे मंडळाच्या ४,१८६ घरांच्या सोडतीसाठी अर्जदारांनी अक्षरशः रेकॉर्डब्रेक प्रतिसाद दिला आहे. तांत्रिक अडचणींमुळे अर्जाची अंतिम तारीख वाढवण्यात आली असून, घर मिळवण्याच्या आशेने हजारो नागरिकांनी शेवटच्या टप्प्यात अर्ज करण्यास सुरुवात केली आहे.

आतापर्यंत १.८ लाखांहून अधिक अर्ज करण्यात आले असून, त्यापैकी जवळपास १.३३ लाख अर्जदारांनी अनामत रक्कम भरून अर्ज पूर्ण केले आहेत. म्हणजेच एका घरासाठी सरासरी ४३ अर्जदारांमध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे. पुण्यातील घरांच्या वाढत्या किमतीमुळे म्हाडाची ही सोडत अनेकांसाठी मोठी संधी ठरत आहे. (MHADA Pune Lottery)

अर्ज करण्याची अंतिम तारीख काय? :

सोडतीदरम्यान आलेल्या तांत्रिक अडचणी आणि अर्ज सादर करताना वाढलेल्या तक्रारींची दखल घेऊन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२५ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत) वाढवण्यात आली आहे.

– RTGS/NEFT द्वारे पैसे भरणाऱ्यांसाठी अंतिम तारीख – १ डिसेंबर २०२५
– संगणकीय सोडत – ११ डिसेंबर २०२५ दुपारी १२ वाजता

म्हाडाने स्पष्ट केले आहे की ही अंतिम मुदत असून पुढील वाढ दिली जाणार नाही.

MHADA Pune Lottery | काय आहे घरांचे वर्गीकरण? :

या सोडतीमध्ये जाहीर झालेल्या घरांमध्ये खालीलप्रमाणे वर्गीकरण आहे.

– २०% सर्वसमावेशक योजनेतील — ३,२२२ घरे
– १५% एकात्मिक योजनेतील — ८६४ घरे

अर्जदारांसाठी महत्त्वाचा सल्ला :

म्हाडाने अर्जदारांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की,
– दलाल किंवा एजंटांवर विश्वास ठेवू नका
– अतिरिक्त शुल्क, कमिशन किंवा वचनांवर अवलंबून राहू नका
– अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज आणि माहिती घ्या
– वेळेत कागदपत्रे आणि फी भरून अर्ज पूर्ण करा

म्हाडाची ही सोडत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासचे परिसरात घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी ठरणार आहे. अर्जांची संख्या पाहता स्पर्धा तीव्र असली तरी पारदर्शक प्रणालीमुळे अनेकांचे घराचे स्वप्न आता साकार होणार आहे.

११ डिसेंबर २०२५ रोजी संगणकीय पद्धतीने होणाऱ्या अंतिम सोडतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

News Title: Record Applications for Pune MHADA Lottery: Final Deadline Extended to November 30, 2025

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now