RCB च्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी, चाहते नाराज

On: April 11, 2025 10:40 AM
RCB
---Advertisement---

RCB l बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बुधवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) पुन्हा एकदा निराशाजनक खेळी करत दिल्ली कॅपिटल्सकडून 6 विकेट्सने पराभव पत्करला. या पराभवामुळे आरसीबीने आयपीएल इतिहासातील एक वाईट विक्रम आपल्या नावावर केला आहे. आयपीएलमध्ये एका मैदानावर सर्वाधिक सामने गमावणाऱ्या संघांमध्ये आता आरसीबी आघाडीवर आहे. (RCB)

RCB ने बंगळुरूमध्ये एकूण 45 सामने गमावले आहेत, जे आयपीएलमधील कोणत्याही संघासाठी सर्वाधिक आहे. याआधी दिल्ली कॅपिटल्सने दिल्लीमध्ये 44 सामने गमावले होते. कोलकाता नाईट रायडर्सने कोलकात्यात 38 तर मुंबई इंडियन्सने मुंबईमध्ये 34 सामने गमावले आहेत. या आकडेवारीवरून आरसीबीचा घरच्या मैदानावरील अपयश स्पष्टपणे दिसून येतो.

केएल राहुलची एकहाती खेळी, आरसीबीची डगमगती कामगिरी :

सामन्याच्या सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्सने लक्ष्याचा पाठलाग करताना काही विकेट लवकर गमावल्या होत्या. मात्र, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या केएल राहुलने अव्वल फॉर्म दाखवत 53 चेंडूत 93 धावा फटकावल्या. त्याला ट्रिस्टन स्टब्सने 38 धावांची महत्त्वपूर्ण साथ दिली. दोघांनी मिळून RCB च्या गोलंदाजीची वाट लावली.

RCB कडून भुवनेश्वर कुमारने अचूक गोलंदाजी करत 2 विकेट घेतल्या, पण यश दयाल आणि जोश हेजलवूड फारच महागडे ठरले. दयालने 4 षटकांत 45 धावा दिल्या तर हेजलवूडने 40 धावा खर्च केल्या. गोलंदाजीतील ही अनियमितता आरसीबीसाठी सर्वात मोठा चिंतेचा विषय ठरत आहे.

RCB l फलंदाजांचा अपयश, RCB पुन्हा अडचणीत :

प्रथम फलंदाजी करताना RCB ने काही चांगली सुरुवात केली. फिल सॉल्ट आणि टिम डेविडने प्रत्येकी 37 धावा केल्या, तर रजत पाटीदारने 25 धावा जोडल्या. मात्र मधल्या फळीतील इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले आणि आरसीबीचा डाव फक्त 163 धावांवर संपुष्टात आला. हे लक्ष्य दिल्लीने सहज पार केले.

RCB कडून पुन्हा एकदा असंतुलित फलंदाजी आणि कमकुवत गोलंदाजी पाहायला मिळाली. संघातले स्टार खेळाडू सतत अपयशी ठरत असल्याने संघ व्यवस्थापनालाही अनेक प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. घरच्या मैदानावर सातत्याने होणाऱ्या पराभवामुळे संघाच्या आत्मविश्वासावर मोठा परिणाम झाला आहे.

एकाच मैदानावर सर्वाधिक सामने गमावलेले संघ :

संघ: आरसीबी, गमावलेले सामने: ४५, ठिकाण: बंगळुरू
संघ: दिल्ली कॅपिटल्स, गमावलेले सामने: ४४, ठिकाण: दिल्ली
संघ: कोलकाता नाईट रायडर्स, गमावलेले सामने: ३८, ठिकाण: कोलकाता
संघ: मुंबई इंडियन्स, गमावलेले सामने: ३४, ठिकाण: मुंबई

News Title: RCB Sets Unwanted IPL Record with Most Losses at a Single Venue – Bengaluru

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now