IPL जिंकली RCB आणि मालामाल झाले मुकेश अंबानी, कमावले हजारो कोटी रुपये

On: June 4, 2025 10:47 AM
Mukesh Ambani IPL Earnings
---Advertisement---

Mukesh Ambani IPL Earnings | इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ चा अंतिम सामना ३ जून रोजी पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. विराट कोहलीसाठी हा हंगाम खूपच खास ठरला, कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची १८ वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली. या वर्षीच्या हंगामात आरसीबी संघ प्रथमच चॅम्पियन ठरला. त्यांनी अंतिम सामन्यात पंजाब किंग्सवर ६ धावांनी विजय मिळवत विजेतेपदाचा चषक उंचावला. मात्र, आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्याने केवळ बीसीसीआय (BCCI) नव्हे, तर ‘जिओ हॉटस्टार’ या ब्रॉडकास्टरवरही पैशांचा पाऊस पाडला. यंदा ६४.३ कोटी प्रेक्षकांनी अंतिम सामना पाहण्याचा आनंद लुटला, ज्यामुळे व्यूअरशिपचे नवीन विक्रम प्रस्थापित झाले. (Mukesh Ambani IPL Earnings)

गेल्या वर्षी ६०.२ कोटी क्रिकेटप्रेमींनी जिओ सिनेमावर आयपीएल फायनल पाहण्याचा आनंद लुटला होता. यंदा हा विक्रम मोडीत निघाला. आता जिओ सिनेमा आणि हॉटस्टारचे विलीनीकरण (मर्जर) झाले आहे, त्यामुळे ‘जिओ हॉटस्टार’वर कोट्यवधी लोकांनी पंजाब किंग्स आणि आरसीबीचा अंतिम सामना पाहिला. या प्रचंड व्यूअरशिपमुळे ब्रॉडकास्टर कंपन्यांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचा किती टक्के हिस्सा?

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यातील अंतिम सामन्यातून मुकेश अंबानी यांनी भरपूर पैसा कमावला. हॉटस्टार आणि जिओ सिनेमाच्या विलीनीकरणानंतर ‘जिओ हॉटस्टार’मध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा ६३.१६ टक्के हिस्सा आहे. यात ४६.८२ टक्के ‘वायाकॉम १८’ च्या माध्यमातून आणि १६.३४ टक्के थेट हिस्सेदारी आहे. अंतिम सामन्यादरम्यान मिळालेल्या जबरदस्त व्यूअरशिपमुळे आज, ४ जून रोजी, कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात तेजी पहायला मिळू शकते, ज्यामुळे अंबानींच्या संपत्तीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Mukesh Ambani IPL Earnings | कसा पैसा कमावतात?

सामना पाहण्यासाठी लोक ‘जिओ हॉटस्टार’चे सबस्क्रिप्शन विकत घेतात, त्यातून ‘जिओ हॉटस्टार’ला पैसा मिळतो. सबस्क्रिप्शन प्लॅनमधून महसूल वाढण्याचा थेट अर्थ हा आहे की, मुकेश अंबानी यांची घसघशीत कमाई होते. केवळ सबस्क्रिप्शन प्लॅनमधूनच नाही, तर सामन्याच्या लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान जाहिरातींमधूनही मुकेश अंबानी तगडी कमाई करतात. कंपन्या आपल्या उत्पादनांच्या जाहिरातींसाठी ब्रॉडकास्टर कंपन्यांना मोठ्या प्रमाणात पैसे देतात. (Mukesh Ambani IPL Earnings)

किती हजार कोटींची कमाई?

आयपीएल सामन्यादरम्यान १० सेकंदाच्या जाहिरातीसाठी १८ ते १९ लाख रुपये आकारले जातात. या वेळी त्यात २० ते ३० टक्के वाढ होऊ शकते, असे आयपीएल सुरू होण्याआधी मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले होते. मुकेश अंबानी आयपीएल सामन्यादरम्यान जाहिरातींच्या माध्यमातून ६ हजार कोटी रुपयांची कमाई करू शकतात, अशी आयपीएल सुरू होण्याआधी चर्चा होती.

सध्या तरी कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. तुम्ही सामन्यादरम्यान ज्या जाहिराती पाहता, त्यासाठी ब्रॉडकास्टर (‘जिओ हॉटस्टार’) कंपनी मोठ्या प्रमाणात पैसे आकारते. अंतिम सामन्यानंतर याबद्दलची अधिकृत माहिती समोर येऊ शकते, ज्यात नेमके जाहिराती आणि सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून किती पैसा कमावला, याचा तपशील असेल. पण याबद्दल सध्या कोणतीही अधिकृत माहिती नाही.

News Title: RCB Crowned Champions in IPL 2025, But Mukesh Ambani Earns the Most

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now