RBI | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठे पाऊल उचलले आहे. ग्राहकांच्या सोईसाठी आणि बॅंकचे काम सुरळीत व्हावे यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मृत ग्राहकांचे बँक खाते आणि लॉकरच्या दाव्यांच्या निराकरणासाठी विशिष्ट कालावधी दिला आहे. त्या कालावधीनंतर बँकेला ग्राहकांना नुकसान भरपाई द्यावी लागेल.
ग्राहकांना नुकसान भरपाई :
बँक खाते उघडाताना ग्राहकांना वारसदार लिहावा लागतो. म्हणजेच त्या ग्राहकांनंतर नोंदवलेल्या वारसादाराचा जमा पैश्यांवर हक्क असेल. आता मृत ग्राहकांच्या बँक खाते आणि लॉकरच्या दाव्यांचे निराकरण करण्याची अंतिम मुदत 15 दिवस केली आहे.
अरबीआयकडून बँकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यक कागदपत्र जमा झाल्यास 15 दिवसांच्या आत दाव्यांचा निकाल लागला पाहिजे असे न झाल्यास ग्राहकांना नुकसान भरपाई द्यावी लागेल.
RBI | काय आहेत नेमके निर्देश :
RBI ने ‘रिझर्व्ह बँक इंडिया (settlement of claims in respect of Deceased Customers of Bank) Directions, 2025’ नावाचे नवीन नियम बनवले आहेत. हे नियम मार्च 2026 पासून लागू होणार असून याचा उद्देश बँकेच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याचा आहे.
जर खात्यात नॉमिनी असल्यास खात्याची शिल्लक रक्कम वारसदाराला दिली जाईल. त्यांनंतर बँकची जबाबदारी पूर्ण झाल्याचे म्हणाले जाईल. तसेच जर खात्यामध्ये नॉमिनी नसेल आणि रक्कम एका विशिष्ट मर्यादेखाली असेल तर सोप्या प्रक्रियेने काम पूर्ण होईल. ही मर्यादा सहकारी बँकासाठी 5 लाख रुपये असून इतर बँकांसाठी ती 15 लाख निश्चित करण्यात आली आहे.
प्रक्रियेला विलंब झाल्यास भरपाई तरतूद :
- जर बँकेकडून वेळेत दाव्यांची सेटलमेंट झाली नाही तर त्यांना ग्राहकांना नुकसान भरपाई द्यावी लागेल.
- खाते प्रकरणासाठी 4 टक्के दराने व्याज बँकेला द्यावा लागेल.
- लॉकर प्रकरणात बँक प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी 5000 द्यावे लागतील.
-
News title : RBI’s big decision! Bank accounts of deceased will be settled within 15 days, bank will pay compensation in case of delay






