RBI Recruitment 2025 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आरबीआयने ग्रेड बी ऑफिसर पदाच्या 120 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. (RBI Recruitment 2025)
या भरतीत ग्रेड बी जनरल पदासाठी 83 जागा, डीईपीआर (DEPR) साठी 17 जागा, तर डीएसआयएम (DSIM) साठी 20 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या पदांसाठीची परीक्षा 18 आणि 19 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे.
पात्रता निकष :
ग्रेड बी जनरल पदासाठी : कोणत्याही विषयात पदवीधर उमेदवार, किमान 60 टक्के गुणांसह (SC/ST/दिव्यांग उमेदवारांसाठी 55%).
ग्रेड बी DEPR पदासाठी : इकॉनॉमिक्स किंवा फायनान्समध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पीजीडीएम/एमबीए.
ग्रेड बी DSIM पदासाठी : संख्याशास्त्र किंवा गणित विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक. (RBI Recruitment 2025)
उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार सवलत मिळेल.
RBI Recruitment 2025 | परीक्षा शुल्क :
खुला, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्ग : ₹850 + GST
SC, ST आणि दिव्यांग प्रवर्ग : ₹100 + GST
अर्ज प्रक्रियेसाठी उमेदवारांनी opportunities.rbi.org.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. ऑनलाईन नोंदणी करून आवश्यक कागदपत्रं आणि फी भरल्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल.
निवड प्रक्रिया :
दोन वेळा ऑनलाईन पद्धतीने लेखी परीक्षा
त्यानंतर मुलाखत
ग्रेड बी ऑफिसर पदासाठी खुल्या व ईडब्ल्यूएस उमेदवारांना कमाल 6 वेळा परीक्षा देण्याची संधी असेल. इतर प्रवर्गातील उमेदवारांवर प्रयत्नांची मर्यादा राहणार नाही.
RBI Recruitment 2025 | वेतन आणि सुविधा :
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन मिळणार आहे. मूळ वेतन ₹78,450 दरमहा असून ग्रेड पेच्या हिशोबाने ते वाढत जाईल. सर्व भत्त्यांसह पगार साधारण ₹1.5 लाख प्रतिमहा इतका असेल.
याशिवाय बँकेकडून निवासस्थान उपलब्ध न केल्यास उमेदवारांना दरमहा घरभाडे भत्ता (HRA) दिला जाणार आहे. त्यामुळे ही नोकरी आर्थिक सुरक्षिततेसोबत प्रतिष्ठाही देणारी ठरणार आहे. (RBI Recruitment 2025)
रिझर्व्ह बँकेत अधिकारी म्हणून काम करण्याची संधी ही प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थ्याचं स्वप्न असतं. या भरतीमुळे हजारो उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवण्याची संधी मिळणार आहे.






