गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! RBI ने घेतला मोठा निर्णय

RBI Monetary Policy 2024 | देशातील सर्वोच्च बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वांत मोठा निर्णय घेतला आहे. RBI ची बहुप्रतिक्षित चलनविषयक धोरण समितीची बैठक आज (7 जून) झाली. या बैठकीत रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor shaktikanta das) यांनी यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पूर्ण अर्थसंकल्पापूर्वी हा निर्णय घेण्यात आलाय. फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दरात शेवटचा बदल करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर तो 6.5 टक्के करण्यात आला होता. तेव्हापासून दर स्थिर आहेत.

व्याजदरात कोणताही बदल नाही

रिझर्व्ह बँकेच्या शक्तिशाली चलनविषयक धोरण समितीची ही सलग आठवी बैठक होती. या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. रेपो दरात कोणताही बदल न केल्यामुळे लोकांच्या ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाहीये.

रेपो दरात कोणताही बदल न केल्यामुळं व्याजदरात कपातीची अपेक्षा करणाऱ्यांची सपशेल निराशा झाली आहे. मात्र, याचा फायदा हा गुंतवणूकदारांना होणार आहे. ज्यांनी FD (RBI Monetary Policy 2024 ) मध्ये पैशांची गुंतवणूक केली आहे त्यांना उच्च रेपो दरामुळं FD वर जास्त व्याजाचा लाभ मिळत राहील.

रेपो रेट म्हणजे म्हणजे काय?

आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. हा रेपो रेट म्हणजेच बँकांना दिला जाणारा कर्जाचा दर होय. जेव्हा हा दर म्हणजेच बँकांना व्याज देण्याचा दर कमी होतो तेव्हा (RBI Monetary Policy 2024 ) कर्ज स्वस्त होते. याचा थेट परिणाम हा होम लोन, ऑटो लोन, पर्सनल लोनवर होत असतो. या कर्जाच्या किंमतीमुळे ईएमआयच्या किमतीही वाढतात.

आज झालेल्या बैठकीमध्ये चलनविषयक धोरण समितीने रेपो दर स्थिर ठेवण्याचा बहुमताने निर्णय घेतला. एमपीसीच्या 6 पैकी 4 सदस्यांनी रेपो दरात बदल न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी दिली.

News Title : RBI Monetary Policy 2024 Repo rate

महत्त्वाच्या बातम्या-

सुप्रिया सुळेंनी विजयानंतर गाठले अजितदादांचे घर; चर्चांना पुन्हा आले उधाण

“चंद्राबाबू आणि नितीशकुमार आज तिकडे तर उद्या आमच्याकडे..”; ‘या’ खासदाराचा खळबळजनक दावा

मोठी बातमी! अजित पवार गटाच्या नेत्याला ईडीकडून दिलासा

“देवेंद्र फडणवीस छोटा राजन आणि नरेंद्र मोदी…”; संजय राऊतांची जहरी टीका

निकालानंतर महायुतीतील वाद चव्हाट्यावर; शिवसेना नेत्याचा भाजप नेत्याला गंभीर इशारा