‘या’ आहेत देशातील सर्वात ३ सुरक्षित बँका! RBI ने केलं जाहीर

On: December 4, 2025 9:16 AM
Safe Banks
---Advertisement---

Safe Banks | भारतातील बँकांमध्ये पैसे ठेवताना अनेकांना सुरक्षेची शंका वाटते. नागरिकांचा विश्वास वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने देशातील सर्वात स्थिर आणि अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या तीन बँकांची निवड केली आहे. या बँकांची आर्थिक मजबुती, व्यवस्थापन आणि संकटपरिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता लक्षात घेऊन त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

देशातील सर्वात सुरक्षित बँकांची निवड :

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), HDFC बँक आणि ICICI बँक या तीन संस्थांना देशातील सर्वात विश्वासार्ह बँका म्हणून ओळख दिली आहे. बँकिंग क्षेत्रात त्यांना “डोमेस्टिक सिस्टिमिकली इम्पॉर्टंट बँक्स” अर्थात D-SIBs म्हणून वर्गीकृत केले जाते. (RBI Lists India’s Safest Three Banks)

याचा अर्थ असा की या तिन्ही संस्था भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि कोणत्याही गंभीर परिस्थितीतही त्यांचे संचालन थांबण्याची शक्यता नसते, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. कारण या बँका देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा मूलभूत आधार मानल्या जातात आणि त्यांना धक्का बसल्यास आर्थिक रचनेवर थेट परिणाम होऊ शकतो.

Safe Banks | तीनही बँकांचा देशाच्या जीडीपीमध्ये मोठा वाटा :

या यादीत दोन खाजगी बँकांचा समावेश असल्याने अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. सामान्य समजुतीनुसार सरकारी बँका अधिक सुरक्षित मानल्या जातात; मात्र आरबीआयच्या अहवालानुसार या तीनही बँकांचा देशाच्या जीडीपीमध्ये मोठा वाटा आहे.

तसेच त्यांच्या कामकाजातील छोट्यातल्या छोट्या अडचणीचाही परिणाम शेअर बाजार आणि देशातील आर्थिक वातावरणावर होऊ शकतो. त्यामुळे आवश्यकतेनुसार भारत सरकार आणि आरबीआयने या संस्थांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी थेट हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतलेला आहे, ज्यामुळे ग्राहकांचे ठेवी पूर्णपणे सुरक्षित राहतात.

या बँकांना लागू असलेले विशेष नियम :

आरबीआयच्या नियमानुसार, D-SIBs म्हणून ओळखल्या गेलेल्या या संस्थांना इतर बँकांपेक्षा जास्त भांडवली तरतूद ठेवणे बंधनकारक आहे. यासाठी त्यांना ‘कॉमन इक्विटी टियर 1’ (CET 1) नावाचा अतिरिक्त राखीव निधी कायमस्वरूपी उपलब्ध ठेवावा लागतो. हा निधी अचानक निर्माण होणाऱ्या आर्थिक दबावाचा सामना करण्यासाठी उपयोगात आणला जातो आणि त्यामुळे बँकेच्या नियमित कामकाजावर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही. (RBI Lists India’s Safest Three Banks)

या अतिरिक्त सुरक्षात्मक तरतुदींमुळे ग्राहकांच्या जमा रकमेवर कोणतेही संकट येत नाही आणि बँकांची स्थिरता कायम राखली जाते. त्यामुळे SBI, HDFC बँक आणि ICICI बँक या तिन्ही संस्थांमध्ये ठेवलेले पैसे सर्वात सुरक्षित मानले जात असल्याचे आरबीआयने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. देशातील लाखो ग्राहकांसाठी ही माहिती नक्कीच दिलासा देणारी आहे.

News Title: RBI Lists India’s Safest Three Banks

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now