महाराष्ट्रातील ‘या’ सहकारी बँकेवर आरबीआयचा हातोडा! पैसे काढण्यावर आले निर्बंध

On: December 18, 2025 5:31 PM
RBI News
---Advertisement---

RBI News | महाराष्ट्रातील बँकिंग क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने राज्यातील एका नामांकित सहकारी बँकेवर कडक निर्बंध लागू केले असून, याचा थेट फटका बँकेच्या ठेवीदारांना बसणार आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे संबंधित बँकेतील ग्राहकांना आपल्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. (Cooperative Bank Maharashtra)

आरबीआयकडून लावण्यात आलेले हे निर्बंध पुढील सहा महिन्यांसाठी लागू असणार आहेत. बँकेची आर्थिक स्थिती समाधानकारक नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही काळात देशभरातील अनेक सहकारी, सरकारी आणि खासगी बँकांवर आरबीआयने कारवाई केल्याचे पाहायला मिळाले असून, नियमांचे पालन न करणाऱ्या बँकांवर कठोर भूमिका घेतली जात आहे.

नाशिकमधील ‘लोकनेते आर. डी. आप्पा क्षीरसागर सहकारी बँक’ अडचणीत :

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात कार्यरत असलेल्या लोकनेते आर. डी. आप्पा क्षीरसागर सहकारी बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे. या बँकेवर आरबीआयने निर्बंध लागू केल्याने हजारो ठेवीदारांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या बँकेचे चेअरमन पद मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सभापती आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्याकडे आहे. (Nashik Bank News)

आरबीआयने बँकेच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. बँकेची आर्थिक स्थिती चिंताजनक असल्याचे निरीक्षण आरबीआयकडून नोंदवण्यात आले असून, त्यानंतरच हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

RBI News | सहा महिन्यांसाठी कर्ज, ठेवी आणि पैसे काढण्यावर बंदी :

आरबीआयच्या आदेशानुसार या सहकारी बँकेला कोणतेही नवीन कर्ज मंजूर करता येणार नाही किंवा विद्यमान कर्जांचे नूतनीकरण करता येणार नाही. तसेच बँकेला नवीन ठेवी स्वीकारण्यास, कोणतीही आर्थिक जबाबदारी घेण्यास किंवा मालमत्ता विक्री करण्यासही मनाई करण्यात आली आहे. (Cooperative Bank Maharashtra)

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी दिलेली नाही. हे निर्बंध पुढील सहा महिन्यांसाठी लागू राहणार असून, त्यानंतर आरबीआय पुन्हा एकदा बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेणार आहे. बँकेची परिस्थिती सुधारली नाही, तर हे निर्बंध पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित बँकेच्या ग्राहकांसाठी पुढील काही महिने अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.

News Title: RBI Imposes Strict Restrictions on Nashik Cooperative Bank, Customers Barred from Withdrawing Money

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now