आरबीआयकडून ‘या’ बँकेचा परवाना रद्द; 23 जुलैपासून बँकेचे सर्व व्यवहार बंद

On: July 24, 2025 5:10 PM
RBI Cheque New Rule
---Advertisement---

RBI Bank License Cancelled | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आणखी एका सहकारी बँकेवर मोठी कारवाई केली आहे. कर्नाटकातील द कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (Karwar Urban Co-op Bank Ltd.) चा बँकिंग परवाना 22 जुलै 2025 रोजी रद्द करण्यात आला असून 23 जुलैपासून बँकेचे सर्व व्यवहार थांबवण्यात आले आहेत.

का रद्द केला परवाना? :

RBI ने परवाना रद्द करताना स्पष्ट केले की, बँकेकडे पुरेसे भांडवल नाही आणि भविष्यात कमाई होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे बँक बँकिंग नियमन कायदा, 1949 अंतर्गत कलम 11(1), 22(3)(ड), 22(3)(अ), 22(3)(ब), 22(3)(क), 22(3)(ई) यासारख्या अनेक तरतुदींचे पालन करण्यात अपयशी ठरली आहे.

ठेवीदारांच्या हितासाठीही ही कारवाई गरजेची असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. बँकेकडे सर्व ठेवीदारांचे पैसे परत देण्याची आर्थिक ताकद नसल्याने, बँकेचा व्यवसाय सुरू ठेवणं हे सार्वजनिक हिताच्या विरोधात जाईल, असं आरबीआयचं म्हणणं आहे.

RBI Bank License Cancelled | ठेवीदारांचे काय? :

बँक बंद झाल्यानंतर सर्वसामान्य ठेवीदारांच्या मनात नैराश्य निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र, RBI च्या आदेशानुसार डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून प्रत्येक ठेवीदाराला ₹5 लाखांपर्यंत रक्कम परत मिळेल.

बँकेच्या माहितीप्रमाणे, 92.90% ठेवीदार पात्र आहेत आणि याआधीच ₹37.79 कोटींचे वाटप DICGC मार्फत करण्यात आले आहे.

कारवाईची पुढील प्रक्रिया :

बँकेवर लिक्विडेटर नेमण्याचे निर्देश कर्नाटकच्या सहकारी संस्थांच्या रजिस्ट्रारला देण्यात आले आहेत. यानंतर लिक्विडेशनच्या प्रक्रियेनुसार बँकेची मालमत्ता विकून शिल्लक रकमेचे वाटप केले जाईल.

याचबरोबर आरबीआयने महाराष्ट्रातील उल्हासनगर येथील ‘कोणार्क अर्बन को-ऑप बँकेवर’ही 23 एप्रिल 2024 पासून निर्बंध लावले होते. हे निर्बंध आता 23 ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढवण्यात आले आहेत.

News Title: RBI Cancels Licence of Karwar Urban Co-operative Bank from July 23, Depositors to Get Refund up to ₹5 Lakh

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now