आता ATM मधून ₹100 आणि ₹200 च्या नोटा…; RBI च्या निर्णयाने ग्राहकांवर होणार मोठा परिणाम!

On: April 29, 2025 9:46 AM
ATM Safety Tips
---Advertisement---

RBI ATM New Rules | भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सर्व बँका आणि व्हाइट लेबल एटीएम ऑपरेटरना (WLAO) आदेश दिला आहे की त्यांच्या एटीएममध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटांचा पुरवठा वाढवावा. यामुळे लहान मूल्यवर्गाच्या नोटांच्या टंचाईचा त्रास लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. (RBI ATM New Rules)

ATM मध्ये ₹100 आणि ₹200 नोटा उपलब्ध करण्यावर भर

सध्या बँकेच्या एटीएममधून मुख्यतः 500 रुपयांच्या नोटा मिळतात, जे सामान्य व्यवहारांसाठी अडचणीचे ठरते. याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी RBI ने नवे आदेश जारी केले आहेत. नवीन सर्क्युलरनुसार, बँकांना आणि व्हाइट लेबल एटीएम ऑपरेटरना टप्प्याटप्प्याने 100 आणि 200 रुपयांच्या नोटांचा पुरवठा नियमित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

RBI च्या निर्देशांनुसार, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत देशातील 75 टक्के एटीएममध्ये किमान एका कॅसेटमधून 100 किंवा 200 रुपयांच्या नोटा उपलब्ध असाव्यात. पुढील टप्प्यात, 31 मार्च 2026 पर्यंत 90 टक्के एटीएममध्ये ही सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. यामुळे नागरिकांना एटीएममधून छोट्या नोटा सहज मिळतील आणि त्यांचा रोजच्या व्यवहारात मोठा फायदा होईल.

ATM व्यवहार महागणार; नवे नियम 1 मेपासून लागू

1 मे 2025 पासून एटीएम व्यवहाराच्या नियमांमध्येही बदल होणार आहेत. जर ग्राहकांनी त्यांच्या होम बँकेच्या बाहेरच्या एटीएमचा वापर केला, तर प्रत्येक व्यवहारासाठी जास्त शुल्क भरावे लागणार आहे. सध्या या व्यवहारासाठी 17 रुपये शुल्क आकारले जाते, जे 1 मेपासून 19 रुपये होईल. त्याचप्रमाणे, इतर बँकेच्या एटीएममधून बॅलन्स तपासणीसाठी लागणारे शुल्क 6 रुपयांवरून 7 रुपयांवर वाढणार आहे.

ही शुल्कवाढ भारतीय राष्ट्रीय पेमेंट महामंडळाच्या (NPCI) शिफारशीवर आधारित असून, RBI ने त्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना सावध राहून व्यवहार नियोजन करणे गरजेचे ठरणार आहे, अन्यथा अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

Title : RBI ATM New Rules 100 and 200 Notes Availability

 

Join WhatsApp Group

Join Now