‘या’ कारणामुळे खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये प्रचंड चढ-उतार!

On: August 20, 2024 11:01 AM
Food Inflation
---Advertisement---

Food Inflation l गेल्या काही महिन्यांपासून खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढतच चालल्या आहे. आता या वाढत्या किंमती संदर्भात याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) सतर्क झाली आहे. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एमडी पात्रा यांनी एका अहवालाद्वारे म्हटले आहे की, आरबीआयच्या आर्थिक धोरणाच्या माध्यमातून आम्ही महागाई दर नियंत्रित करण्यात यशस्वी झालो आहोत. मात्र गेल्या काही महिन्यांत खाद्यपदार्थांच्या किमतींमुळे अनेकदा अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे RBI यावर लवकरच ठोस पॉल उचलण्याच्या तयारीत आहे.

महागाईचा दर नियंत्रणात ठेवणे सोपे नाही :

यासंदर्भात आधी माहिती अशी की, डेप्युटी गव्हर्नर एमडी पात्रा म्हणाले की जर अन्नधान्य महागाई अशीच राहिली तर आर्थिक धोरण बनवताना सावधगिरी बाळगावी लागेल. अन्नधान्य चलनवाढीची स्थिती बिघडली तर महागाईचा दर नियंत्रणात ठेवणे सोपे जाणार नाही. तसेच अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी चलनविषयक धोरण महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे चलनविषयक धोरणात आवश्यक बदल करून आपण अन्नधान्य महागाईचा प्रभाव कमी करू शकतो.

जून 2020 ते जून 2024 दरम्यान, खाद्या महागाई दर आश्चर्यकारक झाला आहे. दरवर्षी अन्नधान्य महागाईचा आकडा काही महिन्यांत झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अतिउष्मा आणि पावसामुळे भाजीपाला आणि फळांच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. दुसरीकडे, महागाई ऐतिहासिकदृष्ट्या घसरली आहे. अन्नधान्याच्या महागाईमुळे सर्वसामान्यांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Food Inflation l यासंदर्भात पतधोरणात गांभीर्याने विचार करणार :

अहवालानुसार, मान्सूनमधील बदल आणि तीव्र उष्णता हे हवामानातील बदलांचे परिणाम आहेत. 2020 नंतर असे अनेकदा घडले आहे. 2020 मध्ये अन्नधान्य महागाई सरासरी 6.3 टक्के होती. तर 2016 ते 2020 दरम्यान हा आकडा केवळ 2.9 टक्के होता. अशा स्थितीत आगामी पतधोरणात याबाबत गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.

या वाढत्या खाद्यपदार्थांच्या किमतींमुळे अनेकदा अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम हा अन्नधान्याच्या किमतीवर दिसून येत आहे. त्यामुळे यासंदर्भात आरबीआय लवकरच निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

News Title : RBI alert about huge fluctuations in food prices

महत्वाच्या बातम्या-

मृत्यूच्या खोट्या अफवांवर भडकला श्रेयस तळपदे; म्हणाला, “मी जीवंत आहे”

ग्राहक आनंदी! सोनं झालं स्वस्त, रक्षाबंधनानंतर ‘इतके’ घसरले भाव

…तर सीमकार्ड होणार ब्लॅकलिस्ट; सप्टेंबरपासून TRAI आणणार नवा नियम

खुशखबर! राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा होणार पोलीस भरती, एकूण पदे किती?

आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल?, जाणून घ्या तुमचे राशी भविष्य

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now