Ravindra Waikar Accident | शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar Accident ) यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वारा जवळ हा अपघात झाला. अपघात घडला तेव्हा खासदार वायकर हे गाडीतच होते. टेम्पोचालकाने त्यांच्या कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
या अपघातात कोणतीही जीवित हानी किंवा कोणी जखमी झालंय का याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. रविवारी मध्यरात्री खासदार वायकर यांच्या कारचा अपघात झाला. पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली.
खासदार रवींद्र वायकर यांच्या कारचा अपघात
आयशर टेम्पो आणि वायकरांच्या गाडीची रविवारी मध्यरात्री धडक झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्याठिकाणी दाखल झाले. या प्रकरणी आता चौकशी केली जात आहे. ज्या टेम्पोने वायकर यांच्या कारला धडक दिली त्याचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती आहे. काही मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आलाय. (Ravindra Waikar Accident )
या घटनेची माहिती मिळताच राजकीय वर्तुळात देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, रवींद्र वायकर यांनी एप्रिल 2024 मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला धक्का देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता. 1992 पासून सलग चार वेळा मुंबई महापालिकेत ते नगरसेवक पदी निवडून आले.2014 मध्ये त्यांनी फडणवीस सरकारमध्ये गृहनिर्माण व उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रीपद सांभाळलं होतं.
नुकत्याच झालेल्या लोकसभा 2024 च्या निवडणुकीत रवींद्र वायकर (Ravindra Waikar Accident ) यांनी ठाकरे गटाच्या अमोल कीर्ती करांचा पराभव करत विजय मिळवलाय. अशात त्यांच्या अपघाताची बातमी समोर आली आहे. या अपघातात कोण जखमी झालंय का?, याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
News Title : Ravindra Waikar Accident
महत्त्वाच्या बातम्या-
‘अचानक-भयानक महिला वर्गाविषयी पुळका..’; प्राजक्ता माळी प्रकरणी किरण मानेंची पोस्ट
सिनेसृष्टीत खळबळ! प्रसिद्ध अभिनेत्याचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह
सर्वात मोठी बातमी! वाल्मिक कराड कोणत्याही क्षणी पोलिसांसमोर सरेंडर होणार?
ठाकरे गटाला मोठं खिंडार, तब्बल ‘इतक्या’ पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
आज सोमवती अमावस्या, भोलेनाथ ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!






