Ravindra Jadeja l भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने क्रिकेटच मैदान गाजवल्यानंतर आता तो राजकीय मैदान गाजवण्यास सज्ज झाला आहे. कारण रवींद्र जडेजाने राजकारणात प्रवेश केला आहे. तो भारतीय जनता पक्षाच सदस्य झाला आहे. जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा गुजरातच्या जामनगरमधून भाजपच्या आमदार आहेत. रिवाबाने नुकतीच जडेजाबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.
जडेजाच्या पत्नीने सोशल मीडियाद्वारे दिली माहिती :
रिवाबाने एका पोस्टद्वारे सांगितले की, रवींद्र जडेजाने भाजपचे सदस्यत्व घेतले आहे. जडेजाने अलीकडेच 2024 च्या टी20 विश्वचषकानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रवींद्र जडेजाने पत्नी रिवाबासोबत अनेकदा प्रचार केला आहे. निवडणुकीदरम्यान रवींद्र जडेजा पत्नी रिवाबासोबत भाजपचा प्रचार करताना दिसले आहेत. त्यांनी अनेक रोड शो देखील केले आहेत.
जडेजाची पत्नी रिवाबा जामनगर उत्तर मतदारसंघातून आमदार आहे. अशातच आता रवींद्र जडेजाने भाजपचे सदस्यत्व घेतले आहे. रिवाबाने X वर एक पोस्ट शेअर करून हि माहिती दिली आहे.
Ravindra Jadeja l जडेजाची क्रिकेट विश्वातील कामगिरी :
जडेजाने टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याचा आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड देखील चांगला आहे. जडेजाने T20 विश्वचषक 2024 नंतर T20 आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. जडेजाने टीम इंडियासाठी तब्बल 74 टी-20 सामने खेळले आहेत. या कालावधीत 515 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 54 विकेट्सही घेतल्या आहेत.
जडेजाची एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे त्याने 15 धावांत 3 बळी घेतले आहेत. जडेजा अजूनही भारताकडून एकदिवसीय आणि कसोटी खेळणार आहे. त्याच्यासोबत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनीही T20 फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
News Title – Ravindra Jadeja Joined BJP
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
लाडक्या बाप्पाच्या आगमनापूर्वीच आनंदवार्ता, सोन्याचे दर घरसले; काय आहे सध्या भाव?
राज्यात 29 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार, महाराष्ट्रात 4 मोठ्या प्रकल्पांना मान्यता
आज हरितालिकेचा व्रत, जाणून घ्या पूजेची योग्य वेळ आणि शुभ मुहूर्त






