Ravindra Jadeja | भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली ६०० विकेट्स पूर्ण करत ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. इंग्लंडविरुद्ध (England) नागपूर (Nagpur) येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडेत (ODI) त्याने ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली. जडेजाच्या फिरकीच्या जादूने इंग्लंडच्या फलंदाजांना धक्का दिला, त्याने ३ विकेट्स घेत भारतीय संघाला मजबूत स्थितीत नेले. हा सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Vidarbha Cricket Association Stadium) खेळला गेला.
जेम्स अँडरसनला मागे टाकत नवीन विक्रम
या शानदार प्रदर्शनासह जडेजाने इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक वनडे विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जेम्स अँडरसन (James Anderson) ला मागे टाकले. त्याने ४० विकेट्सचा अँडरसनचा विक्रम मोडून प्रथम क्रमांक मिळवला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स
- अनिल कुंबळे (Anil Kumble) – ४०१ सामने, ९५३ विकेट्स
- रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) – २८७ सामने, ७६५ विकेट्स
- हरभजन सिंग (Harbhajan Singh) – ३६५ सामने, ७०७ विकेट्स
- कपिल देव (Kapil Dev) – ३५६ सामने, ६८७ विकेट्स
- रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) – ३५२ सामने, ६०० विकेट्स
- झहीर खान (Zaheer Khan) – ३०३ सामने, ५९७ विकेट्स
- जवागल श्रीनाथ (Javagal Srinath) – २९६ सामने, ५५१ विकेट्स
- मोहम्मद शमी (Mohammed Shami) – १९१ सामने, ४५२ विकेट्स
- जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) – २०४ सामने, ४४३ विकेट्स
- इशांत शर्मा (Ishant Sharma) – १९९ सामने, ४३४ विकेट्स
जडेजाची फिरकीचा कमाल, जो रूटला बाद करत विक्रम साकारला
१५ व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या जडेजाने सुरुवातीपासूनच चेंडूला उत्कृष्ट वळण देत इंग्लंडच्या फलंदाजांना त्रास दिला. अक्षर पटेल (Axar Patel) याने जडेजाच्या आधी गोलंदाजी केली असली, तरी अनुभवी जडेजाने डाव अधिक प्रभावी ठरवला.
जडेजाने आपल्या पहिल्या विकेटसाठी इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट (Joe Root) ला झटपट यष्टीचीत केले. त्याने वेगाने टाकलेल्या चेंडूने रूटला चकवले आणि नवा विक्रम नोंदवला.






