पुणे पोलिसांकडून महिन्याला किती रुपयांची वसुली?, रवींद्र धंगेकरांनी थेट यादीच दिली

On: May 27, 2024 5:27 PM
Ravindra Dhangekar serious allegations against pune police
---Advertisement---

Ravindra Dhangekar | पुणे अपघात प्रकरणाला आता राजकीय रंग चढला आहे. या प्रकरणी रोजच धक्कादायक खुलासे उघड होत आहेत. अल्पवयीन आरोपी मुलाला अगोदर 15 तासांच्या आत जामीन नंतर त्याची रॉयल ट्रीटमेंट, अल्कोहोल चाचणीचे खोटे अहवाल, त्यातच आजच समोर आलेले ससून रुग्णालयातील कनेक्शन यामुळे हे प्रकरण अजूनच चर्चेत आलंय.

यामुळे पुणे पोलिसांवर देखील संशय घेतला जातोय. कॉँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी तर अगदी घटनेच्या पहिल्या दिवसापासून धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी अनेक व्हिडिओ देखील समोर आणले आहेत. अशात धंगेकर (Ravindra Dhangekar )यांनी पुणे पोलिसांच्या वसूलीची सगळी यादीच बाहेर काढली आहे.

धंगेकर यांनी केले गंभीर आरोप

धंगेकर (Ravindra Dhangekar )यांनी पुण्यातील उत्पादन शुल्क विभागात धडक देत पुणे शहरात अवैधरित्या चालणाऱ्या पब आणि ड्रग्जच्या मालकांकडून पोलीस प्रत्येक पबचालक, बारमालक महिन्याला लाखो रुपयांचे हप्ते गोळा करण्याचे गोरख धंदे करतात,याचा पाढा वाचला.

पुण्यातील नाईट लाईफला पाठीशी घालणाऱ्या सुपरीटेंडंट घरण सिंग राजपूत यांना साधारण महिन्याचे प्रत्येक हॉटेल मधून पैशाचे पाकीट पुरवले जाते ती लिस्टची धंगेकर यांनी समोर आणली आहे. त्यांनी वसूली करणाऱ्याची नावे देखील जाहीर केली आहेत.

विमाननगर, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, भुगांव भुकुम, बाणेर, हिंजेवाडी, पिंपरी चिंचवड, लोणावळा आदी. भागातील कलेक्शन करणारे कॉन्स्टेबल सागर धुर्वे, तात्या शिंदे, समीर पडवळ, स्वप्नील दरेकर, गोरे मेजर, गोपाल कानडे तसेच खाजगी व्यक्ती युवराज पाटील, मुन्ना शेख, रवी पुजारी, तानाजी पाटील, माऊनी शिंदे, राजु इ. व काही लायसन्स धारक जसे राहुल रामनाथ, सुन्नी सिंह होरा, बाळासाहेब राऊत पण वसुली करतात. असं धंगेकर (Ravindra Dhangekar )म्हणाले आहेत.

कोणाकडून किती वसूली?

1) द माफिया १ लाख
2) एजंट जॅक्स प्रत्येक outlet ५० हजार total १० -१२ outlet
3) बॉलेर २ लाख महिना
4) 2 bhk lakh. (राजाबहादूर मिल्स)
5) दिमोरा १ lakh (राजाबहादूर मिल्स)
6) मिलर १ लाख (राजाबहादूर मिल्स)
7) TTF rooftop ५० हजार (बाणेर)
8) बँक स्टेज ९० हजार (Vimanngr. & Moh. Wadi)
9) ठिकाणा १.५ लाख ३ outlet चे
10) स्काय स्टोरी ५० हजार
11) जिमी दा ढाबा ५० हजार ( पाषाण)
12) टोनी दा ढाबा ५० हजार
13) आयरीश ४० हजार
14) टल्ली टुन्स – ५० हजार
15) ऍटमोस्ट फेयर ६० हजार
16) रुड लॉज ६० हजार
17) द टिप्सी हॉर्स ६० हजार
18)रेन फ़ॉरेस्ट रेस्टो बार ५० हजार
19) 24K-बालेवाडी, विमाननगर, सेनापती बापट रोड – १.५ लाख
20) कॅफे सीओ 2 (cafe CO2) हॉटेल भूकंम १ लाख महिना
21) कोको रिको हॉटेल भूगाव ७५०००/- महिना
22) स्मोकी बिच हॉटेल भुकुंम ७५०००/- महिना
23) सरोवर हॉटेल भूगाव १ लाख महिना
24) जिप्सी हॉटेल भुकुंम ५०००० महिना
25) साईबा हॉटेल ३००००/-

या सह वाईन्स शॉप माल ठेवणारे सनी होरा यांचे १८ हॉटेल बार, २ वाईन्स शॉप, ३ बिअर शॉपी व इतर ढाबे (होलसेल लिकर) ३.५ लाख रुपये.

26) बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे ६६ बार, ३० वाईन्स शॉप, ३५ बिअर शॉपी ५.५ लाख (होलसेल लिकर)
27) कैलास जगताप व इतर यांचे ११ बार, ८ वाईन्स शॉप, ९ बिअर शॉपी २.५ लाख (होलसेल लिकर)
28) कोरेगाव पार्क व कल्याणीनगर, बालेवाडी हायस्ट्रीट, कोंढवा, सेनापती बापट रोड, शिवाजीनगर, या भागातील सर्वच लेट नाईट चालणारे पब, रुफटॉप रेस्टॉरंटला प्रत्येकी कमीत कमी ५० हजार महिन्याला (प्रत्येकी)
29) वाईन्स शॉपचा माल ठेवणारे परमिट रुमला कमीत कमी महिन्याला – २० (प्रत्येकी)
30) रेस्टॉरंट व ढाबेच्या ठिकाणी अवैध दारू विक्रीसाठी – महिन्याला कमीत कमी २५ ते ५० (प्रत्येकी)
31) शाम जगवानी व इतर यांचे ११ वाईन्स शॉप मधून होलसेल दारू विक्री व ऑनलाईन होम डिलेव्हरी करिता महिन्याला २.५ लाख.
32) एक्साइज division १२ – प्रत्येक ५० हजार – ६ लाख रूपये.
33) दारु चे होलेसेलर ३२ – ५० हजार प्रत्येकी महिना.
34) साखर कारखाने १८ ते २० कारखाने -५० हजार महिना
35) नवीन परमिटरूमबार – १२ (ग्रामीण)
36) नवीन परमिटबार -१२ ते १५ (महानगर पालिका)
37) बिअर शॉपी (ग्रामीण)- ३
38) बिअर शॉपी (शहर)- ५

यासोबतच स्वतः एजंट म्हणून कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि सर्व काम कॉन्स्टेबल सागर धुर्वे व तात्या शिंदे हे दोन व्यक्ती फूड लायसन्ससह सर्व परवाने काढतात. ही माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या स्टाफने दिली आहे, असा दावा धंगेकरांनी केला. ७८ लाख रूपये महिना कलेक्शन असून २ वर्षात नवीन लायसेन्स केलं त्याचे २.५ कोटी रुपये. अशाप्रकारे लाखो रुपयांचा हप्ता पोलीस प्रशासन या पब आणि बार मालकांकडून गोळा करत आहेत, असा आरोपही धंगेकर (Ravindra Dhangekar ) यांनी केला आहे.

News Title –  Ravindra Dhangekar serious allegations against pune police

महत्त्वाच्या बातम्या-

“..म्हणून राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला नाही”; अजितदादांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

गुरू रंधावा करतोय शहनाज गिलला डेट, म्हणाला “मला खूप छान वाटतं…”

अग्रवाल कुटुंबामुळे माझ्या मुलाने… तक्रारदार पित्याच्या आरोपांनी पुण्यात पुन्हा खळबळ

मुनव्वर फारुकीने दुसऱ्यांदा उरकलं लग्न?, ‘त्या’ फोटोमुळे चर्चेला उधाण

सुनील टिंगरेंच्या अडचणी वाढल्या, डॅाक्टरच्या प्रकरणात पुन्हा आलं नाव

Join WhatsApp Group

Join Now